शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आता मिळणार २४ तासांत वीज जोडणी

By admin | Updated: September 24, 2016 01:41 IST

कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे.

मोबाईल अ‍ॅप : महावितरणचा नवा उपक्रमगोंदिया : कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे. महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने हे शक्य होणार असून शहरासह ग्रामीण भागात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करवून दिली गेली आहे. ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास विविध कागदपत्रे घेवून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता काळानुरूप वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीतही सुसूत्रता आली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करीत आहे. त्यातून आता ग्राहक वीज कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी वीज कंपनीने मोबाईल अ‍ॅप लॉंच केले आहे. या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने आता ग्राहकांना बील भरणे, मीटर रिंडींग घेणे आदी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होत असतानाच नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्याचीही सुविधा मिळत आहे. त्यात नवीन वीज कनेक्शन अधिक सुविधाजनक बनवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीने राज्यात २४ तासात नवीन वीज कनेक्शन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपवरून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करावयाचा आहे. या मागचा उद्देश असा की, महावितरणद्वारा वीज जोडणी देण्याची संपूर्ण कारवाई आॅनलाईन करणे हा होय. शिवाय नवीन वीज जोडणीचे अर्ज प्राप्त होताच त्याबाबतची तांत्रीक व अन्य बाबींची माहिती महावितरणच्या प्रणालीतून आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना अ‍ॅपमुळे शक्य झाली आहे. (शहर प्रतिनिधी)- १२ उपविभागात सुविधा गोंदिया परिमंडळाच्या अधिन असलेल्या गोंदिया व भंडारा मंडळात आठ व चार महावितरण उपविभागीय कार्यालयात अशा १२ उपविभागातून अ‍ॅपद्वारा तोवीच तासात वीज जोडणी देण्यात येणार आहे. यात गोंदिया मंडळात मेन मार्केट कक्ष कार्यालय, दासगाव, गोरेगाव, तिरोडा, आमगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी येथे तर भंडारा मंडळात उत्तर भंडार कक्ष, शहापूर कक्ष, साकोली व तुमसर येथे हा उपक्रम राबविला जात आहे. परिमंडळात २६८ वीज जोडणी आतापर्यंत राज्यात १२६० ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून परिमंडळात यापैकी २६८ वीज ग्राहक आहेत. यामध्ये सडक-अर्जुनी उपविभागात ४९ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये दुर्गम व नक्षलग्रस्त भागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत इच्छूक ग्राहकाकडून साधा अर्ज सुद्धा प्राप्त झाल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी संबंधीत ग्राहकाकडे जाणून त्यांच्याकडून उर्वरीत कागदपत्र व पाहणी करून त्यांना कनेक्शन देणार आहेत.