लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करुन त्या पाडण्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले होते. यामुळे केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर नगर परिषदेने शहरातील ६५ जीर्ण इमारतींच्या मालकांना इमारत पाडण्याची नोटीस बजावली आहे.पाच सहा दिवसांपूर्वीच जीर्ण इमारत कोसळून २० ते २२ जणांचा बळी गेल्याची घटना घडली. या घटनेने जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. गोंदिया शहरात देखील ७० ते ७५ जीर्ण इमारती आहेत. यापैकी चार ते पाच जीर्ण इमारती मुख्य रस्त्यालगत असल्याने त्या केव्हाही कोसळून मोठी जीवीत हाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून लोकमतने शहरातील जीर्ण धोकादायक इमारतींकडे नगर परिषदेचे लक्ष वेधले. शहरातील धोकादायक व जीर्ण इमारतींचे वृत्त प्रकाशीत करुन या प्रश्नांचे गांर्भीय नगर परिषदेच्या लक्षात आणून दिले. याचीच दखल नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी नगररचनाकार विभागाला शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करुन नोटीस बजाविण्याचे निर्देश दिले.नगररचनाकार विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ६५ इमारतींची अवस्था जर्जर झाली असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर नगररचनाकार विभागाने जीर्ण इमारतींच्या मालकांना नोटीस बजावून त्या त्वरीत पाडण्याची नोटीस बजावली आहे. या जीर्ण इमारती मालकांनी स्वत:हून इमारत न पाडल्यास त्या नगर परिषदेतर्फे पाडल्या जातील. तसेच त्याचा खर्च इमारत मालकांकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
नगर परिषदेने बजावली ६५ जीर्ण इमारतींना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:11 IST
शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करुन त्या पाडण्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले होते. यामुळे केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
नगर परिषदेने बजावली ६५ जीर्ण इमारतींना नोटीस
ठळक मुद्देशहरातील धोकादायक इमारती त्वरित पाडा