शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सुरगाव-सावराटोला नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:15 IST

पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे६० वर्षांपासून रस्ताच नाही : प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा

आर.एस.टेंभुर्णे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव-सावराटोला या गावांना जोडण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे ही दोन्ही गावे नॉट रिचेबल असतात.सन १९६१ मध्ये सावरटोला गटग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये सुरगावचा समावेश करण्यात आला. मात्र दोन गावांना जोडणारा रस्ताच नाही. या मार्गावर एक नाला असून पावसाळ्यात या नाल्यावरुन पाणी वाहत असते. त्यामुळे सुरगावचा सावराटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मुंगली अथवा चापटी या गावावरुन ७ किमीचे अंतर कापून सावरटोला येथे जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी सुरगाव ग्रामवासीयांकडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी, शासन ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला येथे रस्ताच तयार करुन द्यायचा नसेल तर त्यांनी सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावला वगळून त्यांचा समावेश मुंगली अथवा चापटी ग्रामपंचायतमध्ये करण्याची मागणी येथील गावकºयांची आहे. सुरगाव हे रिठी गाव आहे. चापटी मालगुजारीमध्ये या गावाचा समावेश होता. परदेशीनबाई व हिराईबाईचा सुरगाव म्हणून ओळखला जातो. या दोघींची मालगुजारी चापटी व सुरगाव येथे होती. कालंतराने हे गाव रिठी झाले. त्यानंतर चापटी व बाहेरगावावरुन काही लोक या ठिकाणी राहयला लागले. नंतर सुरगाव उदयास आले. या गावाची लोकसंख्या २१२ ऐवढी आहे. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती.पहिला वर्ग तीन वर्षापूर्वी या गावात सुरु झाला. परंतु गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी ३ रा व ४ था वर्ग सुरु होण्यापूर्वीच या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जि.प.गोंदियाच्या शिक्षण विभागाने बंद केली.आता या गावची पहिल्या वर्गापासूनची मुले मुंगली येथील तीन कि.मी. अंतरावरील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत पायी चालत जातात. तर गावात आरोग्य, शिक्षण, बेरोजगारीच्या अनेक समस्या आहेत.विविध दाखल्यांसाठी पायपीटविद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व गावकऱ्यांना विविध कामासाठी लागणारे प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज, रंोजगार हमी कामावर जाण्यासाठी कागदपत्रांच्या कामांसाठी ग्रामपंचायत सावरटोला येथे ७ कि.मीे.चे अंतर पार करुन मुंगली किंवा चापटीवरुन जावे लागते. पावसाळ्यात या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असल्याने गावकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्यावरुन तिढासुरगाव व सावरटोला या दोन गावांच्या मध्ये एक नाला आहे. या नाल्याला लागून चापटी व सावरटोला येथील काही शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता तयार करण्यासाठी तीन शेतकरी जमिन देण्यास तयार आहेत. मात्र दोन शेतकरी जमीन देण्यास तयार नाही. प्रशासनाने पुढाकार घेवून शेतकºयांची समजूत घातल्यास रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. असे उपसरपंच भागवत मुंगमोडे यांनी सांगितले.पूल तयार करा अथवा ग्रा.पं.मधून वगळानाल्यालगत असलेली सुरगाव व सावराटोली जमीन शासनाने अधिग्रहीत करुन या दोन गावांना जोडण्यासाठी नाल्यावर पूल तयार करावा. अथवा ते शक्य होत नसेल तर सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावचा मुंगली किंवा चापटी ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा, अशी येथील गावकºयांची मागणी आहे.

सुरगाव व सावरटोला या गावाला जोडणारा रस्ता तयार करण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात या गावाचा सावरटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे ७ कि.मी.ची पायपीट करुन जावे लागते.-प्रेमदास लांडगे,गावकरी, सुरगाव..........................................नाल्यालगतच्या शेतजमिनी अधिग्रहित करुन रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु काही शेतकरी शेतजमिनी द्यायला तयार नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत आहे. पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने येथील प्राथमिक शाळा सुध्दा बंद केली.- भागवत मुंगमोडे,उपसरपंच,गट ग्रामपंचायत सावरटोला