शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फायर आॅडिट नाही? नो टेन्शन!

By admin | Updated: January 5, 2017 00:50 IST

गोंदियातील हॉटेल बिंदल येथे लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असला तरीही गोंदिया नगर परिषदेचे अग्निशमन दल

केवळ १० हॉटेलांना पत्र : तालुक्याच्या ठिकाणी असावे अग्निशमन दल गोंदिया : गोंदियातील हॉटेल बिंदल येथे लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असला तरीही गोंदिया नगर परिषदेचे अग्निशमन दल अजूनही उदासीनच आहे. आतपर्यंत फक्त १० हॉटेल मालकांना फायर आॅडिट करण्याचे पत्र दिले आहे. मात्र बहुतांश हॉटेल किंवा व्यावसायिकांना पत्रच दिले गेले नसल्यामुळे अग्निशमन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. सर्व नियमांना धाब्यावर बसवून कोट्यवधीची कमाई करणाऱ्या गोंदियातील हॉटेल, भोजनालय यावर कुणाचे नियंत्रण नाही किंवा कुणी लक्षही घालायला तयार नाही. बिंदल हॉटेलच्या घटनेने आता सर्वानाच भयभीत करुन सोडले आहे. गोंदिया नगर परिषदेतर्फे शहरात हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरेन्ट, मिष्ठान्न दुकाने व इतर अशा १५ हजार ७४० व्यावसायीकांना व्यवसाय करण्याचे परवाने दिले आहेत. या हॉटेलांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्यामुळे अशा गंभीर घटनांना चालना मिळते. परवाना देताना नगर परिषदेकडून कसलीही चौकशी होत नाही. या प्रतिष्ठानामध्ये कमीतकमी १२ अग्नीशमन यंत्र असणे अपेक्षीत आहे. ज्या हॉटेल किंवा भोजनालयाचे फायर आॅडीट झाले नाही त्या प्रतिष्ठानांवर आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियम २००६ कलम ५, ६, ७ व ८ च्या तरतुदीनुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु गोंदिया शहरातील अग्नीशमन विभागाने कसलीही कारवाई केली नाही. या कलमांतर्गत काय कारवाई केली जाते त्यांना माहीतच नाही. (तालुका प्रतिनिधी)