शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाणी टंचाईचे प्रशासनाला ‘नो टेंशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलसाठी लागणारे सुटे सामान आणि पाईप उपलब्ध नाहीत. परिणामी बोअरवेल दुरूस्तीचे कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत लागत आहे. गावकऱ्यांची पाणी टंचाईबाबत ओरड वाढल्यानंतरही प्रशासनाने मात्र कुठलीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर प्रशासन नो टेशंनमध्ये ...

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून पाईपचा तुटवडा : महिलांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलसाठी लागणारे सुटे सामान आणि पाईप उपलब्ध नाहीत. परिणामी बोअरवेल दुरूस्तीचे कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत लागत आहे. गावकऱ्यांची पाणी टंचाईबाबत ओरड वाढल्यानंतरही प्रशासनाने मात्र कुठलीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर प्रशासन नो टेशंनमध्ये असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा अत्यल्प पाणीसाठा आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली असून उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता.त्यावरुन जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र जिल्ह्यात सध्या नेमके या विरोधात चित्र आहे.जानेवारी महिन्यातच गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना प्रशासनाला मात्र त्याच्याशी काहीे घेणे देणे नसल्याचे चित्र आहे. भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. त्यासाठी नवीन पाईपची गरज आहे.जिल्ह्यातील आठही पं.स.मध्ये जवळपास ७० बोअरवेल बंद आहे. तर मागील सहा महिन्यापासून पाईप व सुटे सामान उपलब्ध नाहीत.पाईप अभावी बोअरवेल नादुरस्त असल्याने गावातील महिलांची सकाळपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मात्र गावकºयांच्या समस्येशी जिल्हा प्रशासनाला काहीच घेणे देणे नसल्याचे चित्र आहे.या विषयाला घेऊन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या मागील दोन तीन सभेत या विषयावर चर्चा घडवून आणली. तेव्हा पाईप खरेदीसाठी ७२ लाख रुपये पाणी पुरवठा विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात सभेत घेण्यात आला होता.मात्र, डिसेंबरच्या सभेची अद्यापही अवतरण प्रत तयार झाली नसल्याने तो निधी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळाला नाही. परिणामी पाईपची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.आठ दिवसात तोडगा काढा, अन्यथा आंदोलनजिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला परिणामी भूजल पातळी खालावली आहे. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात बोअरवेलसाठी लागणारे पाईप व सुटे साहित्त्य उपलब्ध नाहीत. यासाठी मागील सभेत चर्चा झाली. त्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही पाईपची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कायम आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर आठ दिवसात तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिला आहे.अध्यक्षांच्या कार्यकाळातील पहिलीच सभा तहकूबमंगळवारी (दि.२३) स्थायी समितीची सभा नव्याने पदारुढ झालेल्या जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांनी बोलावली होती. त्यामुळे या सभेत पाणी टंचाई आणि पाईप खरेदीचा मुद्दा विरोधक लावून धरणार होते. पण ही सभा तहकुब झाल्याने त्यावर चर्चा होवू शकली नाही. दुष्काळ, पाणी टंचाई, २१ बंद शाळा या विषयांवर चर्चाच झाली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ग्रामीण भागातील समस्यांशी काहीच घेणे देणे नसल्याचा आरोप जि.प.सदस्य परशुरामकर, सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, राजलक्ष्मी तुरकर, जियालाल पंधरे, सुखराम फुंडे, किशोर तरोणे यांनी केला आहे.