शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील एकही शाळा बंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

- जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात : २७४ शाळांमध्ये वाजली घंटा कपिल केकत गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ...

- जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात : २७४ शाळांमध्ये वाजली घंटा

कपिल केकत

गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास निर्माण झालेले वातावरण बघून राज्य शासनाने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन शाळा करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातही वर्ग आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील ३७६ पैकी २७४ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोनाबाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची पाळी आली आहे. मात्र, सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २७४ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची पाळी आलेली नाही.

--------------------------

- जिल्ह्यात एकूण शाळा - ३७६

-सध्या सुरू असलेल्या शाळा - २७४

------------------------

२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?

मुले-मुली एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)

आठवी - १०४७५ १०१२६ २०६०१

नववी - १०७१५ १००५७ २०७७२

दहावी - ११६७३ १०८४९ २२५२२

अकरावी - ९००९ ९५०० १८५०९

बारावी - १०६२७ १०२२९ २०८५६

--------------------------------

एकही शाळा बंद नाही

- राज्य शासनाच्या आदेशानुसार पालकांची परवानगी घेऊन जिल्ह्यातील २७४ शाळा सुरू करण्यात आल्या असून, त्यातील एकही शाळा बंद झाली नाही.

- शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील २८९०० पालकांनी संमती दिली असून, त्यानुसार शाळा सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील सर्वांत शाळा सुरू असल्याचे दिसत आहे.

- जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत एकही विद्यार्थी बाधित निघालेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याची गरजच पडलेली नाही.

-------------------------------

विद्यार्थ्यांना मिळाले आपले मित्र

मागील मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने घरातच कोंडून राहावे लागत होते. मात्र, आता शाळा सुरू झाल्याने आपल्या मित्रांना भेटता आले. नियमात राहून का होईना मात्र अभ्यासासोबतच आता मित्रांच्या भेटीगाठी तरी होत आहेत.

-अभिषेक वाघमारे (विद्यार्थी)

-----------------------------

शाळा सुरू झाल्याने आता घराबाहेर पडता येत आहे. नाहीतर मागील वर्षापासून घरातच राहावे लागत होते. आता अभ्यासही होत असतानाच मित्रांसोबतही भेटता येत आहे.

-विनोद तुरकीवार (विद्यार्थी)

---------------------------

मागील वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरात कोंडून होती. घरात राहून त्यांना कंटाळा आला होता. शिवाय ऑनलाइनमध्ये हवा तसा अभ्यास होत नव्हता. आता शाळा सुरू झाल्याने मुले अभ्यास करीत असून, त्यांना घराबाहेरही पडता येत आहे.

-देवीदास कोरटे (पालक)