शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

न. प. निवडणुुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध

By admin | Updated: July 27, 2016 02:18 IST

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांची निवडणूक होऊ घातली आहे.

पाच महिन्यांपूर्वीच कसरत : अनेकांचे राजकीय पक्षात होणार प्रवेश गडचिरोली : नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांची निवडणूक होऊ घातली आहे. गडचिरोली येथे २५ तर देसाईगंज येथे १८ वॉर्डांसाठी निवडणूक होणार आहे. या वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्याने तेथील जागेवर उभा करावयाच्या उमेदवाराचा शोध राजकीय पक्ष व आघाड्यांकडून सध्या सुरू झाला आहे. गडचिरोली शहरात २५ वॉर्डांमध्ये महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आदी प्रवर्गातील उमेदवार लागणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार शोधणे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या आघाडीनेही उमेदवारांची शोधाशोध चालविली आहे. गतनिवडणुकीत युवाशक्तीच्या नावावर अपक्ष निवडून आलेल्या गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव-धात्रक यांनी शिवसेनेचे शिवबंध हाताला बांधले आहे. त्या शिवसेनेकडून मैदानात राहतील. तर त्यांच्याच सहकारी सुषमा राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. देसाईगंज येथेही कल्पना माडावार यांनी शिवसेनेत व गडचिरोली येथे संजय मेश्राम यांनी युवाशक्तीतून भाजपात प्रवेश केला आहे. युवाशक्तीचे आणखी काही नगरसेवक विविध राजकीय पक्षात जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)