शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचे नाव बदलून कुणाचेही भले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:32 IST

कॉँगे्रस शासनकाळातील राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून भाजप सरकारने महात्मा जोतीबा फुले करून दिले. मात्र जोपर्यंत आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स व अत्याधुनिक सुविधा राहणार नाही, तेव्हा भाषणबाजी कामी येणार नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बीजीडब्ल्यु रूग्णालयातील अतिदक्षता कक्षाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कॉँगे्रस शासनकाळातील राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून भाजप सरकारने महात्मा जोतीबा फुले करून दिले. मात्र जोपर्यंत आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स व अत्याधुनिक सुविधा राहणार नाही, तेव्हा भाषणबाजी कामी येणार नाही. जिल्ह्यातील जनतेला येथेच सर्व सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही शासकीय मेडीकल कॉलेजची स्थापन करविली.यातून रोजगाराच्या संधी वाढणार असून जिल्ह्यातील रूग्णालयांत आवश्यक नर्सेसची उपलब्धता वाढणार आहे. फक्त योजनांचे नाव बदलून कुणाचेही भले होणार नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयातील नवनिर्मित अति दक्षता कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडून होती. तेव्हा कुणी पुढे आली नाही. मात्र आमदार अग्रवाल यांनी नवीन मशीनसाठी तीन कोटी रूपये मंजूर करवून आणले. जिल्हास्तरीय जनप्रतिनिधी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रचार करतात. मात्र जबाबदारी स्वीकारून जनतेला सुविधा देण्यासाठी फक्त आमदार अग्रवाल पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले.१०९ लाखांच्या निधीतून निर्मित या वास्तूचे लोकार्पण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. तर १४१ लाखांच्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे भूमिपूजनही याप्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, शकील मंसूरी, व्यंकट पाथरू, सुशिल रहांगडाले, विनोद ठवकर, खलील पठाण, राकेश ठाकुर, संदीप ठाकुर, सुनील तिवारी, सुनील भालेराव, क्रांती जायस्वाल, श्रीचंद पाथोडे, मंटू पुरोहीत, मजूर संघाचे अध्यक्ष बंटी मिश्रा यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.