शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथील शाॅर्ट सर्कीट घटनेची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वितरणचे सब स्टेशन तयार कण्यात यावे, जेणेकरून त्या भागातील नागरिकांची विद्युत पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्कीट होऊन १० निष्पाप बालकांचा बळी गेला होता. ही अंत्यत दुर्दैवी घटना असून या घटनेची भविष्यात पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये म्हणून सर्व शासकीय कार्यालयातील फायर ऑडिट लवकरात लवकर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. शनिवारी (दि. २७) स्थानिक एन.एम.डी.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सहेषराम कोरोटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता गोंदिया वासनिक, अधीक्षक अभियंता गोंदिया सम्राट वाघमारे, अधीक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, कार्यकारी अभियंता गोंदिया वानखेडे, कार्यकारी अभियंता देवरी फुलझेले, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अणे, गोंदिया विभागाचे मुख्य अभियंता आनंद जैन, गोंदिया महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे उपस्थिती होते.कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वितरणचे सब स्टेशन तयार कण्यात यावे, जेणेकरून त्या भागातील नागरिकांची विद्युत पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी राऊत यांच्याकडे केली. प्रास्ताविकातून अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांनी विद्युत विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, पूर्व विदर्भ योजना, कृषिपंप उच्चदाब वितरण प्रणाली योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषीपंप वीज जोडणी धोरणांची माहिती दिली. 

भूमिगत लघुदाब विद्युत वाहिनीचे लोकार्पण- गोंदिया येथील मनोहरभाई कॉलनी येथे शनिवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. ही भूमिगत विद्युत वाहिनी ४ कि.मी.पर्यंत राहणार असून त्याचा लाभ परिसरातील ग्राहकांना होणार आहे. भविष्यात संपूर्ण गोंदिया शहरात भूमिगत विद्युत वाहिनी निर्मिती करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतelectricityवीज