शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो हेल्मेट’ तरीही पेट्रोल

By admin | Updated: July 23, 2016 23:56 IST

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालने बंधनकारक केले असून...

गोंदिया : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालने बंधनकारक केले असून ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यात शासनाच्या या निर्णयाला धुकडावून हेल्मेट नसलेल्यांनाही पेट्रोल दिले जात असल्याचे शनिवारी (दि.२३) दिसले. विशेष म्हणजे या निर्णयामुळे वाहनधारकांत रोष व्याप्त असून काही पेट्रोलपंप संचालकांनीही याचा विरोध दर्शविला. वाहनांची वाढती संख्या, त्यातच बेपर्वाईने भरधाव वेगात वाहन चालविण्यात येत असल्याच्या प्रकारांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेत रस्ता सुरक्षा व अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकीचालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या निमयाची सक्तीने अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने मोटारवाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करीत दुचाकीवरील चालक व मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्यास त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने तसे परिपत्रक काढले आहे. मात्र असे असतानाही शहरासह जिल्हयात शासनाच्या या निर्णयाला धुडकावून लावले जात असल्याचे दिसले. शनिवारी शहरातील पेट्रोलपंपांवर हेल्मेट नसलेल्यांनाही पेट्रोल दिले जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले. हेल्मेट शिवाय पेट्रोल भरण्याचा हाच प्रकार जिल्ह्यातील अन्य ठिकाणांवरही दिसून आला. यातून राज्य शासनाच्या या निर्णयाचे वाहनधारक व पेट्रोलपंप संचालकांकडून स्वागत केले जात नसल्याचे दिसून येते. परिणामी शासनाच्या या निर्णयाला बगल देत ‘नो हेल्मेट’ तरिही पेट्रोल ही स्थिती अवघ्या जिल्ह्यात शनिवारी दिसून आली. (शहर प्रतिनिधी) हेल्मेट सक्ती पण रस्त्यांचे काय हेल्मेट सक्तीच्या या निर्णयाचा वाहनधारकांकडून स्पष्ट विरोध दर्शविण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शासन आपली मर्जी जनतेवर लादत असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने आपल्या मर्जीने हेल्मेट सक्ती करीत आता पेट्रोलसाठीचे बंधन लावले आहे. अपघातांवर आळा घालण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात असतानाच शहरातील खराब रस्त्यांमुळे अपघात घडत नाहीत काय असा सवालही वाहनधारक करीत आहेत. पेट्रोलपंप चालकही नाराज हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे जिल्ह्यातील काही पेट्रोलपंप संचालकांनी स्वागत केले. तर काहींनी राज्य शासनाच्या या निर्णयाप्रती नाराजी दर्शविली. हेल्मेट सक्तीने वाहनधारक अडचणीत येत असतानाच पेट्रोलपंप संचालकांवर शासनाने जबरन हा निर्णय लादत असल्याचेही काहींनी बोलून दाखविले. याबाबत आपल्या असोसिएशनशी चर्चा करून त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचेही बोलून दाखविले.