शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहा वर्षांपासून भरती नाही; भावी गुरुजींनी रस्त्यावर चहा विकायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:14 IST

शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासकीय भरती बंद असल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद केली आणि आता शाळा बंद करण्याचे नियोजन सुरू केले असल्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य पणास लागले आहे. अनेक शाळांमध्ये पाच ते सात शिक्षकांची आवश्यकता आहे, त्या शाळेत केवळ दोन आणि तीन शिक्षक असल्याचे चित्र आहे.शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे. काय करावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पदवी घेऊन पदवी, पदविकाधारक बेरोजगारांनी काय करावे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा तसेच खासगी शाळेतील अनेक पदे रिक्त आहेत. शेकडो शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे शिक्षकांची सुमारे हजारांवर पदे रिक्त आहेत. दहा वर्षांपासून भरती प्रक्रिया होत नसल्याने शिक्षक, अध्यापक, पदविका, पदवीधारकांनी आता रस्त्यावर चहा विकायचा का? असा संतप्त सवाल या डीटीएड, बीएड पात्रधारक बेरोजगार भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात आता केवळ ५ डीएड कॉलेज- जिल्ह्यात डीएडची ८ कॉलेज होती. त्यापैकी तीन कॉलेज बंद झाली आहेत. आता जिल्ह्यात पाच डीएड कॉलेज आहेत. ११०० जागा एकूण आहेत.

दरवर्षी २५० शिक्षक बाहेर पडतात त्यांचे काय ?   शासनाच्या शिक्षण विभागाची भरती बंद असल्याने त्याचा परिणाम डीएड कॉलेजवर झाला आहे. त्यामुळे ७० टक्केच ॲडमिशन झाले आहे. नोकरी मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. त्यामुळे खासगी कॉन्व्हेंटवर अल्पशा मानधनावर डीएड झालेल्या भावी शिक्षकांना काम करावे लागते.

दहा वर्षांपासून भरती नाही

राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती झाली नाही. २०१७ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत प्रक्रिया सुरू झाली; परंतु तीही अद्याप अपूर्ण आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत मध्यंतरी घोळ झाला होता. त्यामुळे सुपेसह इतरांनाही अटक होऊन ती प्रक्रिया लांबलेली होती.डीटीएड, बीएडधारकांची संख्या मोठी असून, शिक्षक पदभरती होत नसल्याने बेरोजगारीच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.

कोणी कंपनीत नोकरी करतो, तर कोणी हॉटेलात 

दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने पदवीधारक बेरोजगारांनी करावे काय, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ते काम करून ते पोट भरत आहे. कुणी खासगी कंपनीत नोकरीला आहे तर कोणी हॉटेलात काम करतो आहे तर अनेक भावी शिक्षक शेतात मजुरीला कामाला जात असल्याचे चित्र आहे.

मी २०१० मध्ये डीएड पास झालो; परंतु अद्यापही नोकरी मिळाली नाही. वय निघून जात आहे, त्यामुळे मिळेल ते काम करावे लागत आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. शेतीत जाऊन शेतीची कामे आणि दूध वाटण्याचे काम करीत आहे.- पंढरी पाल, (डीएड, उमेदवार)

दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. हजारो जागा रिक्त आहेत. शासन डीएड, बीएडधारकांची भरती करत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. परिणामी कॉन्व्हेंटमध्ये चार हजार रुपये महिना पगारावर नोकरी सुरू आहे. त्यात काय होणार, तुम्हीच सांगा.- पराग बनकर, (डीएड, उमेदवार)

 

 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीjobनोकरी