शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:59 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.

ठळक मुद्देग्राहक अडचणीत: चार दिवसांपासून समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.शहर आणि जिल्ह्यात विविध बँकाचे १५० जवळपास एटीएम केंद आहे. बँकांनी सर्वच ग्राहकांना एटीएम वितरीत केले आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्वत:जवळ रोख न बाळगता एटीएम कार्ड ठेवतात. त्यामुळे बाहेरगावी कॅश घेऊन जाण्याची अडचण आणि जोखीम कमी झाली आहे.शहरासह ग्रामीण भागात देखील एटीएमची सुविधा असल्याने बहुतेक सर्वजण स्वत: जवळ रोख बाळगत नाही. एकंदरीत सर्वांनाच एटीएमची सवय लागली आहे. मात्र मागील तीन चार दिवसांपासून एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक लागल्याने ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहे.ही समस्या केवळ एका एटीएममध्ये असेल म्हणून ग्राहक दोन तीन एटीएम केंद्रात जावून चाचपणी करीत आहेत. मात्र तिथे देखील हीच समस्या असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.एटीएममधून पैसे निघत नसल्याने दररोजच्या छोट्या छोटया गरजा भागविण्यासाठी बँकेतून जावून रांगेत लागून पैसे काढण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. मात्र सर्वाधिक एटीएमची अडचण प्रवाश्यांना व बाहेरगावावरुन येणाºया ग्राहकांना बसत आहे.दोनशे, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांची टंचाईसर्वच बँकाना रिर्झव्ह बॅकेकडून पत पुरवठा केला जातो. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून बँकाना रिर्झव्ह बँकेकडून पत पुरवठा झाला नाही. तर दोनशे, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा सध्या बंद झाला असल्याने बँकासमोर देखील अडचण निर्माण झाली आहे. पत पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये कॅश टाकणार कशी असे बँकेचे अधिकाºयांचे म्हणने आहे.कॅशलेस व्यवहारासाठी टंचाईकेंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. यासाठी भीम अ‍ॅप, पेटीएम सारखे प्रयोग राबविले. कॅशलेस व्यवहार भर देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कॅशलेस व्यवहाराला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यामुळेच पत पुरवठा ठप्प करुन ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बाध्य केले जात आहे. सध्या एटीएम केंद्रामध्ये निर्माण झालेली टंचाई हा त्याचाच एक भाग असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.रिझर्व्ह बँकेकडून बँकाना होणार पतपुरवठा मागील चार पाच दिवसांपासून ठप्प झाला आहे.त्यामुळे एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून कॅश मिळताच सर्व एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध करुन दिली जाईल.- दिलीप सिलारे, मुख्य व्यवस्थापक बँक आॅफ इंडिया गोंदिया,काही एटीएममध्ये केवळ दोन हजाराची नोटशहरातील काही बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध आहे. मात्र या एटीएममध्ये केवळ दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे.त्यामुळे दोनशे, पाचशे रुपये काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. तर ज्या ग्राहकांच्या खात्यात केवळ हजार रुपये शिल्लक आहे त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटमुळे दोनशे तिनशे रुपये काढण्यास अडचण जात आहे.

टॅग्स :atmएटीएम