शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनासाठी घोषणा नको, प्रत्यक्ष कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:07 IST

वृक्ष कटाईमुळे जंगले विरळ होत चालली आहेत. जंगलातील औषधीयुक्त वृक्षही नष्ट झाली आहेत. जो तो झाडे लावा झाडे जगवा, हाच नारा देत आहे. पण प्रत्यक्ष कृती कोण करतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या प्रभात फेरीदरम्यान ऐकायला मिळतो. तरी झाडे कापली जातात, मात्र त्या जागेवर झाडे लावणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपर्यावरण धोक्यात : झाडे लावा-झाडे जगवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वृक्ष कटाईमुळे जंगले विरळ होत चालली आहेत. जंगलातील औषधीयुक्त वृक्षही नष्ट झाली आहेत. जो तो झाडे लावा झाडे जगवा, हाच नारा देत आहे. पण प्रत्यक्ष कृती कोण करतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या प्रभात फेरीदरम्यान ऐकायला मिळतो. तरी झाडे कापली जातात, मात्र त्या जागेवर झाडे लावणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिला जातो. एवढेच नाही तर यासाठी अभियानही राबविले जाते. एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी धडपडत असताना इमारत उभारण्याच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल दुर्लक्षित आहे. ले-आऊट पाडून वसाहती उभारताना क्षेत्रफळाच्या १० टक्के झाडे लावणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे पालन न होताच उभारल्या जाणाºया वसाहती पर्यावरण धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहेत.‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाºया प्रभात फेरीदरम्यान ऐकायला येतो. नंतर हा विषय कुणाच्याही डोक्यात राहत नाही. दिवसेंदिवस वाढत जाणाºया लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर घरांची संख्यांही वाढत आहे. शेतजमीन ज्या कृषी उत्पादनासाठी उपयोगी आणल्या जात होत्या, त्या आज अकृषक करुन ले-आऊट पाडले जात आहेत. येथे मोठमोठ्या वसाहती उभ्या होत आहेत. गोंदिया शहर चारही बाजूंनी आज वाढले आहे. कुठे पाण्याचे स्त्रोत असलेल्या तलावाचे सपाटीकरण करुन तर कुठे शेतजमीन अकृषक करुन पाडलेल्या लेआऊटमध्ये वसाहती उभारल्या गेल्या आहेत.यासाठी त्या ठिकाणच्या झाडांची कत्तलही केली गेली. झाडे कापतानाच ती लावली जावी, अशी माफक अपेक्षा असते. उपविभागीय अधिकाºयांकडून अशा ले-आऊटला परवानगी घेतानाच एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के झाडे लावण्याचे बंधन आहे. हे बंधन पाळण्याचे परवानगी मिळेपर्यंत सांगितले जाते. मात्र आज शहराच्या आजूबाजूला असलेल्या एकाही ले-आऊटमध्ये झाडांची लागवड झालेली नाही. हे विशेष सर्व ले-आऊट मोकळे असल्याने दहा टक्के वृक्ष लागवडीचे बंधन पाळलेच जात नाही. हे स्पष्ट आहे. हा विभागही याबाबत फारसा गंभीर दिसत नाही. आता तर अशा ले-आऊटमधील प्रत्येक घरासमोर एक झाड असावे, असे फर्मान शासनाने काढले.यावर संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करुन आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहण्याची गरज आहे. अन्यथा आज गावात बोटावर मोजण्याइतकी दिसणारी झाडे भविष्यात नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.