शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:02 IST

येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचा पाठपुरावा : अनेक वर्षांनंतर मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. त्यामुळे १९९३ पूर्वी नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.राज्य सरकारने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. यामुळे गोंदिया नगर परिषदेतील वर्ग ३ चे २४ आणि वर्ग ४ चे २३ कर्मचाऱ्यांना स्थायी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेत १९९३ पूर्वी कार्यरत असलेल्या १७१ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे.यासाठी आ. अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाचा लाभ गोंदियासह तिरोडा, तुमसर,भंडारा,पवनी नगर परिषदेच्या कर्मचाºयांना सुध्दा लाभ झाला होता. त्यानंतर आता ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जहीरभाई अहमद व सुरेंद्र बन्सोड यांनी आ.अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून याबद्दल अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले.विशेष म्हणजे यापूर्वी नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना केवळ प्रती दिवस ६० ते ७० रुपये मजूरी मिळत होती. मात्र आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रती दिवस ४५० मजुरी दिली जात आहे.याबद्दल दिलीप चाचेरे, नियाज भाई, किशोर उके, राजू भेलावे, किशोर वर्मा, उदय यादव, सुनील जोशी, राजेश शर्मा, योगेश वर्मा यांनी अग्रवाल यांचे आभार मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल