शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयांच्या स्वच्छतेसाठी ‘निर्माल्य संकलन’

By admin | Updated: September 18, 2016 00:35 IST

निर्माल्य टाकल्यामुळे जलाशयांत होत असलेली अस्वच्छता व पाण्याची अशुद्धी टाळण्यासाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य...

१० वर्षांपासून सुरू आहे अभियान : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी गोंदिया : निर्माल्य टाकल्यामुळे जलाशयांत होत असलेली अस्वच्छता व पाण्याची अशुद्धी टाळण्यासाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य संकलन अभियान यंदाही यशस्वीरित्या घेण्यात आले. यंदा जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. येथील मॉ नर्मदा सेवा संस्था, मॉ नर्मदा भजन मंडळ, लोहाणा समाज महा परिषद व सामाजीक वनीकरण विभागाच्या संयुक्तवतीने यंदा निर्माल्य संकलन अभियान शहरात राबविण्यात आले. मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या या अभियानाचा यंदाचा शुभारंभ सिव्हील लाईन्स येथील अपना गणेश उत्सव मंडळातून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक दिलीप भूजबळ, सेवानिवृत्त वन परिक्षेत्राधिकारी अश्वीन ठक्कर, सामाजीक वनिकरण विभागाचे युवराज कंूभलवार, बजरंग दल प्रांत संयोजक देवेश मिश्रा, अपना गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी योगी खंडेलवाल, सुनिल तिवारी, अमित अवस्थी व अन्य उपस्थित होते. या निर्माल्य संकलन अभियानांतर्गत तीन निर्माल्य रथ बनविण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील प्रमुख गणपती उत्सव मंडळांकडे जावून त्यांच्याकडील निर्माल्य संकलीत केले जात आहे. शिवाय दुपारनंतर सुर्याटोला बांधतलाव, पिंडकेपार नाला, टेमनीतील पांगोली नदी घाटवर हे रथ उभे केले जाते. शहरवासीयांकडून या कार्याची प्रशंसा केली जात आहे हे विशेष. यासाठी नर्मदा सेवा संस्थेचे पदाधिकारी राहूल हारोडे, संस्थापक माधव गारसे, अमित यादव, अजय यादव, कपिल वेगड, जितेंद्र वनवे, गणेश शेंडे सहकार्य करीत आहेत.