शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात, गावागावांत तापले राजकारण

By कपिल केकत | Updated: October 26, 2023 18:53 IST

सरपंचपदाचे चार तर सदस्यांचे नऊ अर्ज घेतले मागे

कपिल केकत, गोंदिया: जिल्ह्यात चार ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या सार्वत्रिक व १० ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २५) सरपंचपदासाठीचे चार तर सदस्य पदांसाठीचे नऊ अर्ज मागे घेण्यात आले. यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक असलेल्या गावांमध्ये आता राजकारण तापू लागले असून उमेदवारांनी आपला जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे.

राज्यात कार्यकाळ संपलेल्या तसेच निधन, अपात्रता, राजीनामा आदीसह अन्य कारणांमुळे रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून १० ग्रामपंचायतमध्ये फक्त सदस्यांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. या अंतर्गत उमेदवारी अर्ज सादर करण्याचा टप्पा आटोपला असून बुधवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाचे होते. त्यात सरपंचपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांमधून सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर येथे होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी एक तर सदस्य पदासाठीचे दोन अर्ज मागे घेण्यात आले. तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम येरंडी-देवलगाव येथून सरपंचपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी आलेले सहा अर्ज मागे घेण्यात आले. शिवाय, पोटनिवडणूक होत असलेल्या गावांमधून मात्र एकही अर्ज मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे आता सरपंचपदासाठी जिल्ह्यात एकूण नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात उरले असून ते आपले भाग्य आजमावत आहेत.

उमेदवारांकडून भेटी-गाठी वाढल्या

- येत्या ५ तारखेला निवडणूक होणार असल्याने रिंगणात उरलेल्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये १० ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत फक्त सदस्यांसाठी निवडणूक होत असल्याने तेवढा जास्त जोर दिसत नाही. मात्र सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या चार ग्रामपंचायतमध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांकडून आपल्या मतदारांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत.

आता होणार पार्ट्यांना सुरूवात

- मंगळवारपर्यंत नवरात्र होते व त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांना पार्टी द्यावी लागणार आहे. नवरात्र संपल्याने आता कार्यकर्ते व मतदारही काही ऐकून घेणार नाही. म्हणूनच, आता मतदारांसाठी पार्ट्यांना उधाण येणार आहे.

उमेदवारांची स्थिती दर्शविणारा तक्ता (सार्वत्रिक निवडणूक)

तालुका - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (सदस्य) - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (सरपंच)

  • गोंदिया - ०० - १४ - ०० - ०२
  • आमगाव - ०१ - १४ - ०० - ०२
  • सडक -अर्जुनी - ०२ - १४ - ०१ - ०२
  • अर्जुनी-मोरगाव - ०६ - १५- ०३ - ०३

-------------------------------------------

तालुका - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (पोटनिवडणूक)

  • देवरी - ०० - ०१
  • आमगाव - ०० - ०२
  • गोरेगाव - ०० - ०२
  • तिरोडा - ०० - ०३
  • सालेकसा - ०० - ०२
  • अर्जुनी-मोरगाव - ०० - ००
टॅग्स :Electionनिवडणूक