शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून नऊ आयुर्वेदिक दवाखाने बंद

By admin | Updated: May 28, 2017 00:06 IST

गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने व तीन आम्ल रूग्णालय जिल्ह्यात सुरू आहेत.

निधी झाला बंद: जि.प.ने चालविण्यास दिला नकार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने व तीन आम्ल रूग्णालय जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन आम्ल व सात आयुर्वेदीक असे ९ रूग्णालय मागीले चार ते पाच वर्षापासून बंद आहेत. निधी नसल्यामुळे हे दवाखाने बंद आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सात आयुर्वेदीक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयाची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील तीन ते चार वर्षापासून हे दवाखाने बंद आहेत. गोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदीक दवाखाने निधी अभावी बंद पडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे असे एकूण तीन आंग्ल दवाखाने सुरू आहेत. वन विभागाकडून निधी मिळत नाही १३ वने या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आयुर्वेदीक दवाखान्यांना चालविण्यासाठी वर्षाकाठी एक कोटी रूपयाचा खर्च येत असल्याने हा खर्च करण्यात जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. वन विभागाकडून निधी मिळत नसल्यामुळे हे दवाखाने बंद आहेत. दवाखान्यात ४८ डॉक्टर जिल्ह्यातील आयुर्वेदिक दवाखान्यात ५२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४८ डॉक्टर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात २३ डॉक्टर स्थायी तर २८ डॉक्टर अस्थायी आहेत. चार जागा रिक्त आहेत.