शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव प्रकल्पाचे काम सुरूहोणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:17 IST

तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी निमगाव प्रकल्पासह विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा घडवून आणली.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात विविध मुद्यांवर चर्चा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी निमगाव प्रकल्पासह विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा घडवून आणली. याबाबत तात्काळ कार्यवाही करून शेतकरी व नागरिकांना लाभ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निमगाव प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.या वेळी आ. रहांगडाले यांच्यासह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपवनसंरक्षक युवराज, कार्यकारी अभियंता गेडाम, तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी तळपाले, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे व जिल्हा निवडणूक अधिकारी शुभांगी आंधळे उपस्थित होते.आमदार रहांगडाले यांनी, निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाकरिता राज्य शासनाकडून सर्व आवश्यक कारवाई पूर्ण झाली आहे. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जिल्हास्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले. यावर जिल्हाधिकारी काळे यांनी, शासनाशी संपर्क साधून प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. निमगाव प्रकल्पाचे काम येत्या ६० ते ९० दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.जिल्हाधिकारी काळे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत, जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यावर मात करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती घेण्यात आली. तसेच तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.यावर मात करण्यासाठी आराखडा तयार करुन त्वरित बोअरवेल, विहिरींचे खोलीकरण व विहिरीत बोअरवेल तयार करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रहांगडाले यांनी केली.१३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे गोरेगाव क्षेत्रातील आसलपाणी, खुर्शिपार, पात्री, कुऱ्हाडी यासह ४० गावे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. पीक व मालमत्तेचे नुकसान झाले.तिरोडा ताालुक्यातील बोदलकसा (सुकडी) क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले. तर मुंडीकोटा, वडेगाव क्षेत्रात मध्यम तसेच इतर तालुक्यात अल्प नुकसान झाले. सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावर नुकसानग्रस्त भागाचे सर्वे करण्याचे काम सुरू असून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी काळे यांनी आ.रहांगडाले यांना सांगितले.लीजवाल्यांना ५ हजारांची भरपाई द्याबोदलकसा जलाशयात लीजवर शेती घेवून वटाना, चना, गहू आणि भाजीपाला आदी पिकांची लागवड करण्यात आली. या पिकांचा गारपीट व वादळी पावसाने घात केला. अशा शेतकºयांना नुकसान भरपाईकरिता पाटबंधारे विभागाकडून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी काळे यांना आमदारांनी सांगितले. नुकसानग्रस्त १५ हेक्टर क्षेत्रातील शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.पोंगेझराकरिता रस्ता तयार होणारजिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह पोंगेझरा देवस्थानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येथे भाविकांची ये-जा अधिक होत असल्याने पर्यटन निधीतून रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली. यावर सर्वतोपरी विचार करुन रस्ता तयार करण्यात येईल, असे ठरले. पोंगेझरा पर्यटन निधीतून १ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चाने रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे आमदार रहांगडाले यांनी सांगितले.तुमखेडा दारूबंदीबाबत कारवाईगोरेगाव तालुक्याच्या तुमखेडा (बु.) येथील नागरिकांनी दारुबंदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही विरोधकांनी विरोध केला. नागरिकांची योग्य बाजू घेवून घेतलेल्या दारुबंदीबाबत जिल्हा प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार रहांगडाले यांनी केली. यावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.