पाण्यासाठी जागरण : कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी राजीव फुंडे आमगावपिकांना पाण्याची खरी गरज आता भासत असून पाण्यासाठी शेतकरी दिवसरात्र एक करीत आहे. अशात मात्र शेताला येणारे कालव्याचे पाणी कुणी पळवू नये यासाठी शेतकरी दिवसा शेतात राबून तर रात्री कालव्याजवळ राखणदार म्हणून ‘नाईट ड्यूटी’ करीत असल्याचे चित्र बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत निदर्शनात येत आहे. वृत्त असे की, विभागांतर्गत बनगाव लघू कालवा येथे ४० हे.आर. शेत जमिनीला सिंचनाची मंजुरी आहे. अगोदर बनगाव येथील शेतजमिनीला पाणी पुरवठा मंजुर होता. पण बनगावचा काही भाग माल्ही गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येत आहे. अनिहा नगर जवळील आऊटलेट वरुन बनगावला लघू वितरीकेद्वारे पाणी जाते व तेथे पार बांधण्यात आली. पण माल्ही गावाकडे बनगाव व माल्हीची शेतजमीन असल्याने माल्हीकडे पाणी सोडण्यात येते. बनगाव येथील आऊटलेट लहान असल्याने शेतात पाणी जात नाही असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. म्हणून दगडाची पार बांधून बनगावकडे पाणी अडविण्यात आले. पण रात्रीच्या वेळी माल्ही येथील शेतकरी पार फोडून पाणी वळविण्याच्या नादात असतात. अशावेळी बनगावविरुद्ध माल्ही येथील शेतकऱ्यांमध्ये बहुतेकदा शाब्दीक चकमक होत असते. आपल्या हक्काचे पाणी चोरी जावू नये म्हणून शेतकऱ्यांना अख्खी रात्र कालव्यावर राखणदार म्हणून जागत राहण्याची पाळी आली आहे. शेतकरी दिवसा शेतात मशागत, औषधी देणे, निंदा (तण) काढणे, खत देणे आदी कामे करीत असून रात्रीला अख्खी रात्र आपल्या शेताला पाणी मिळावे यासाठी कालव्यावर जागत आहे. विशेष म्हणजे विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी ढुंकुन सुद्धा पाहत नाही. तसेच पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ केली जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला.पुजारीटोला सेक्शनवरुन ११०० हे.आर. आणि आमगावमधून १००० हे.आर. जमिनीला पाणी दिले जात आहे. शेतजमिनीला पुजारीटोला, कालीसराड, शिरपूर प्रकल्पातून पाणी मिळते. सध्या शिरपूर प्रकल्पातूनच पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यातील पाणी पळविले जाऊ नये म्हणून रात्रपाळीला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व पाण्याच्या पातळीत वाढ करावी अशी मागणी धरमराज कठाणे, राजाराम दोनोडे, प्रमोद मडावी, रविंद्र तरोणे, परमानंद तरोणे, बलीराम ब्राम्हणकर, महेंद्र रहिले, मानिक रहिले, उमेश रहिले, माधोजी कठाणे, नाणू तुरकर, बालचंद तुरकर, रमेश तुरकर, अजय का वळे, भिवराम चुटे, खेतराम थेर, नरेश फुंडे, माधोराव मेंढे, बाबुराव शेंडे, दिनू थेर या शेतकऱ्यांनी केली आहे.कालव्यात शौचालयाचे दूषित पाणीयेथील बनगाव लघू कालव्यात बनगाव ग्रामपंचायतने नागरिकांच्या वॉर्ड क्र.४ मधील घरातील शौचालयांचे दुषित पाण्याचे पाईप बसविले आहे. त्यामुळे सानेगुरुजी नगर, सरस्वती विद्यालय मार्ग येथील शौचालयांचे दुषित पाणी ग्रामपंचायतने मोठे पाईप लावून वळविले आहे. म्हणून शेतजमिनीतील पिकांवर रोगराई पसरत आहे. शेतकऱ्यांना किटकनाशकांचा वापर अधिक प्रमाणात करावा लागत आहे. येथील पाईप लाईन काढून पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर कालव्यावर रात्रीला शेतकऱ्यांची देखरेख असते. विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने रात्री कर्मचारी नियुक्त करता येत नाही. आम्ही पाणी उपलब्ध करुन देतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळावं याकरिता माझे पर्यंत सुरू आहेत.ज्या शेतकऱ्यांनी अवैधपणे पिक लागवड केली अशांच्या पिकांचे निरीक्षण करुन पाणसारा वसुल करण्यात येईल. -अ.का. शिवणकरअभियंता
शेतकऱ्यांची कालव्यावर ‘नाईट ड्युटी’
By admin | Updated: April 30, 2017 00:52 IST