लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे प्रतिबिंब उमटविणाऱ्या ‘लोकमत’ची दखल प्रशासन व राज्यकर्ते तातडीने घेतात. त्यामुळे समस्या सुटतात अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या समाजापुढे वृत्तपत्र हा आरसा आहे. कोरोनामुळे काही प्रमाणात कमी झालेली वाचकांची संख्या आता झपाट्याने वाढली आहे. घराघरात ‘लोकमत’चे स्वागत होऊ लागले आहे. अत्यंत अचूक व सविस्तर माहिती देणा या वृत्तपत्रात ‘लोकमत’चे नाव पहिले असल्याने ‘लोकमत’ वाचल्याशिवाय करमत नाही अशी भावना सुद्धा काही वाचकांनी व्यक्त केली आहे.
वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसतानाही सुरूवातीला धास्तावलेल्या लोकांनी आता नियमित वृत्तपत्र वाचायला सुरूवात केली. २ महिन्याच्या काळात अनेकांनी वृत्तपत्र बंद केले होते. परंतु आता पुढे येऊन नियमित वृत्तपत्र वाचण्यासाठी आम्ही अग्रेसर आहोत. अचूक माहिती देणारे माध्यम म्हणून ‘लोकमत’कडे आम्ही पाहतो. शिवाय वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.
डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी
.....
वृत्तपत्र नियमितपणे घराघरात वाचले जावे. वृत्तपत्र वाचल्यामुळे कोरोनाची लागण होत नाही. मी वृत्तपत्र नियमित वाचत आहे. चुकीच्या अफवांमुळे अनेकांनी वृत्तपत्र बंद केले होते. परंतु मी माझ्या घरचे वर्तमानपत्र नियमित सुरूच ठेवले आहे. मी नियमित वृत्तपत्र वाचत आहे. सर्व वाचकांनी सुद्धा बिनधास्तपणे कुठलीही भीती मनात न बाळगता वृत्तपत्र घेवून नियमित वाचन करावे. वृत्तपत्रातून अचूक माहिती मिळण्यास मदत होते.
डॉ.अविनाश येळणे, अस्थीरोग तज्ज्ञ गोंदिया.
....
वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही असे जगभरातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. वृत्तपत्राचे वाटप करणाऱ्यांनी स्वत:ची योग्य काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता नियमितपणे वृत्तपत्र वाचणे आवश्यक आहे. मी स्वत: नियमित वृत्तपत्र वाचन करतो. त्यामुळे वृत्तपत्रामुळे कोरोना होतो यासारख्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नका.
डॉ. सायास केंद्रे, स्त्रीरोग तज्ज्ञ गोंदिया.
सद्या साथरोगाच्या व लॉकडाऊनच्या काळात ‘लोकमत’ हेच एकमेव वृत्तपत्र विश्वासार्हता व समाजमनाचे प्रतिबिंब वाटते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा सोशल मीडिया वरील व्हायरल संदेशामुळे समाजातील सामान्य नागरिकांमध्ये असलेला संभ्रम ‘लोकमत’च्या बातम्यांमुळे दूर होतात. त्यामुळे ‘लोकमत’चे घराघरांत पुन्हा एकदा जोरदार स्वागत होत आहे. शिवाय वृत्तपत्रामुळे कोरोनाचा कुठलाही संसर्ग होत नाही.
-डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी केटीएस