शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्मित रस्त्याचे वाजविले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:20 IST

शहरातील बाजार भागातील रस्ते व वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राउंड केबलचे काम सोबतच सुरू करण्यात आले. अशात केबल टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून नवनिर्मित रस्ते खोदले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दूरवस्था होत आहे. दरम्यान वेळीच नगर परिषदेने दखल घेतल्याने हे काम थांबले.

ठळक मुद्देअंडरग्राऊंड केबल : आता गट्टू काढून केबल टाकणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील बाजार भागातील रस्ते व वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राउंड केबलचे काम सोबतच सुरू करण्यात आले. अशात केबल टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून नवनिर्मित रस्ते खोदले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दूरवस्था होत आहे. दरम्यान वेळीच नगर परिषदेने दखल घेतल्याने हे काम थांबले.शहरातील बाजार भागातील गुंतागुंतीचे होत चाललेले सर्वीस वायरचे जाळे धोकादायक ठरत आहेत. कित्येकदा यातून शॉटसर्कीट होऊन धोका निर्माण झाला. ही बाब लक्षात घेत वीज वितरण कंपनीकडून आयपीडीएस योजनेंतर्गत बाजार भागात अंडरग्राऊंड केबल टाकले जाणार आहे.सध्या नेहरू चौक ते दुर्गा चौक व गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे. या कामांतर्गत वीज वितरण कंपनीने नव्याने तयार करण्यात आलेल्या नेहरू चौक रस्त्यावर खोदकाम करून केबल टाकले.यासाठी वीज वितरण कंपनीकडून रस्त्याचा एक कोपरा फोडण्यात आला आहे. याची माहिती मिळताच नगर परिषद बांधकाम सभापती शकील मंसुरी यांनी हे काम थांबविले. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना रस्ते न खोदता केबलचे काम करण्याचे व केलेल्या खोदकामाची दुरूस्ती करण्यासाठी भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार, आता वीज वितरण कंपनीकडून रस्त्यांचे खोदकाम करण्याची गरज पडणार नसल्याची माहिती मिळाली. मात्र रस्त्यांच्याकडेला लावण्यात आलेले गट्टू काढून त्याखालून केबल टाकले जाणार आहे. यासाठी वीज वितरण कंपनीकडून सध्या गट्टू लावण्याचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराकडूनच ते कामे केले जाणार असल्याचे मंसुरी यांनी सांगितले.