शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नवीन चौकीमुळे वातावरण सुरक्षित

By admin | Updated: February 18, 2017 01:01 IST

शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती.

अग्रवाल : सावराटोलीत पोलीस चौकीचा शुभारंभ गोंदिया : शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. परिसरातील नागरिक, उत्पादित माल बाजारपेठेत आणणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये या चौकीमुळे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (दि.१७) सावराटोली येथील गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकीचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आ.अग्रवाल यांनी फित कापून तंबूतील चौकीचा शुभारंभ केला. शुभारंभ केल्यानंतर चौकीला भेट दिल्याची पहिली नोंद जिल्हाधिकारी काळे यांनी केली. यावेळी ही सावराटोली पोलीस चौकी २४ तास सुरु असली पाहिजे, अशी अपेक्षा आ.अग्रवाल यांनी व्यक्त केली. तस९च पांढराबोडी व काटी येथेही पोलीस चौकी सुरु करण्यात येईल. गोंदिया शहराचे सिटी सर्व्हेक्षण झाल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया सिटी सर्वेच्या दृष्टीने नगर परिषद पुढाकार घेईल. वादाची सुरूवात ही जमिनीपासून होते. गोंदिया शहरात जमिनीच्या किमती सोन्यापेक्षा जास्त आहे. राज्यातील सर्व जमीन मोजणीचा कार्यक्र म राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या १ मार्च रोजी शहरातील जागेच्या मोजणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल. पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष इंगळे यांनी शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडू असेही सांगितले. प्रास्ताविकातून डॉ.भुजबळ म्हणाले, गोंदिया शहरात देशाचे छोटे स्वरूप दिसून येते. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. पोलीस चौकी उभारु न पोलीस केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. सावराटोली परिसरात गुन्हेगारांचा वावर असल्याचे सांगितले जाते. ही गुन्हेगारी निश्चित आपण मोडीत काढू. या परिसरात सुरक्षितता व शांतता नांदण्यास या चौकीची मदत होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावराटोली पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय गुरपुडे, पोलीस नाईक ओमेश्वर मेश्राम व संदीप नाईक यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्र माला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शेतकरी, व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी) पोलीस क्वॉर्टरची कामे सुरू होणार आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले, पोलीस चौकीच्या सुविधेमुळे धानाचा व्यापार येथे आणता येईल. भाजी मार्केटसुध्दा आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, स्टेट बँकेची शाखा येथे उघडण्यात येणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना रामनगर, सिटी पोलीस स्टेशन, रावणवाडी पोलीस स्टेशनच्या इमारती आणि १४४ पोलीस क्वॉर्टरची कामे येत्या सहा महिन्याच्या आत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.