शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत शहरातील प्रत्येक भागातच कोरोनाचे रुग्ण असल्याने संपृूर्ण शहरालाच कोरोनाचे विळखा घातल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी ९२ बाधितांची नोंद : गोंदिया तालुका झाला कोरानाचे हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा विळखा जिल्ह्यात दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. कोरोना बाधितांचा आलेख दररोज वाढत असून सोमवारी (दि.९५) एकाच दिवशी ९३ कोरोना बाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक झाला असून मागील ६ महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा होय. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे.सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत शहरातील प्रत्येक भागातच कोरोनाचे रुग्ण असल्याने संपृूर्ण शहरालाच कोरोनाचे विळखा घातल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आरोग्य विभागाचा गलथान कारभार देखील पुढे येत आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याची ओरड सुरू आहे. रविवारी आमगाव तालुक्यातील २ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण २० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. मार्च ते जून महिन्यात जिल्ह्यात केवळ २८८ कोरोना बाधित आढळले होते. तर एकट्या आॅगस्ट महिन्यात ११९४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ऑगस्ट महिना कोरोना विस्फोटाचा ठरल्याने चिंतेत भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत १४८५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ९४४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.ऑगस्ट महिन्यात वाढला कोरोनाचा आलेखजिल्ह्यात मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण १४८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले.यापैकी २८८ बाधित मार्च ते जुलै दरम्यान आढळले. तर ११९४ कोरोना बाधित एकट्या ऑगस्ट महिन्यात आढळले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून याला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांनावर कुठलाच वॉच नसून स्थापन केलेले सीमा तपासणी नाका केवळ नाममात्र ठरत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.आत्तापर्यंचा सर्वाधिक आकडाजिल्ह्यात २७ मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना नवीन कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती. यानंतर मे महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक २७, जून महिन्यात ४० आणि ऑगस्ट महिन्यात ८१ आणि ३१ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ९३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होय.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या