शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आठ अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : टिप्परने स्कूल बसला दिलेल्या धडकेत आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) गोंदिया पांगोली नवीन रिंगरोड मार्गावर घडली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील ही आठवी घटना आहे. या मार्गाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.शुक्रवारी टिप्पर ...

ठळक मुद्देबायपास मार्गाचे काम अपूर्ण : नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : टिप्परने स्कूल बसला दिलेल्या धडकेत आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.८) गोंदिया पांगोली नवीन रिंगरोड मार्गावर घडली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील ही आठवी घटना आहे. या मार्गाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.शुक्रवारी टिप्पर आणि स्कूल बसचा अपघात ज्या ठिकाणी घडला त्यापासून काहीच अंतरावर छोटा गोंदिया वस्ती आहे. या परिसरातून जाणाºया बायपास मार्गाचे थोडेसे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गाचे अद्यापही लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे यापूर्वी देखील येथे अपघाताच्या सात घडल्या आहेत. शुक्रवारी घडलेली अपघाताची घटना ही आठवी घटना होती. सुदैवाने या अपघातात कुठलेही जीवीत हाणी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून या मार्गावर किती अपघातांची प्रतीक्षा आहे. या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली त्यापासून काही अंतरावर विद्युत खांब आहे. यापूर्वी देखील एका वाहनाने या विद्युत खांबाला धडक दिल्याने तो वाकला आहे.परिणामी विद्युत तारा देखील खाली लोंबल्या आहेत. त्यामुळे येथे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.माजी नगरसेवक विष्णू नागरिकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की या मार्गावर आधी विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. पण, रस्त्याचे काम पूर्ण करण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. नवीन रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची उंची वाढली असून लोबंलेल्या विद्युत तारांमुळे या मार्गावरुन ये-जा करणाºयांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात चार ते पाच वेळा निवेदन देण्यात आले. पण त्याची सुध्दा अद्याप दखल घेण्यात आली नाही. या मार्गावरील वाकलेले विद्युत खांब त्वरीत न हटविल्यास या विरोधात तीव्र आंदोलन धेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.गतीरोधकाची गरजगोंदिया-नवीन रिंगरोड मार्गावर गतीरोधक असते तर अपघाताची घटना टाळता आली असती. या मार्गावरुन स्कूल बसेससह इतरही वाहनाची वर्दळ असते. वाहनांची संख्या आणि रस्त्यालगत असलेली नागरी वसाहत लक्षात घेऊन या मार्गावर गतीरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.ते विद्युत खांब हटविणारछोटा गोंदिया परिसरातील मार्गावरील वाकलेल्या विद्युत खांबासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता जीजोबा पारधी यांच्याशी संपर्क साधला असता वाकलेले खांब त्वरीत बदलविण्यात येतील. तसेच रस्त्याच्या दुर्तफा दोन विद्युत खांब लावण्यात येणार असल्याचे सांगितले.