शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरण करणे गरजेचे (महिला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST

परसवाडा : देशात महिलांवर होणारे अन्याय अजूनही थांबलेले नाही. तेव्हा महिलांना आपला आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी व आपला सर्वांगीण विकास ...

परसवाडा : देशात महिलांवर होणारे अन्याय अजूनही थांबलेले नाही. तेव्हा महिलांना आपला आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी व आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा व विधी सल्लागार ॲड. माधुरी रहांगडाले यांनी केले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित ज्येष्ठ महिलांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्‌घाटन रजनी कुंभरे व दीपप्रज्वलन सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राणी बालकोठे, मेघा बिसेन, प्रतिमा पटले, झुनेश्वरी वासनिक, राणी सोनवणे, स्वाती चौधरी, गायत्री चौधरी, रागिनी पटले, वनिता सेलोकर, प्रतिमा जैमतवार उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, सरस्वती माता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ महिला व सामाजिक कार्यकर्त्या चारुशिला वैद्य, शकुंतला चौधरी, प्रभा घरजारे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, शशीकला मेश्राम, रजनी काटकर, दुर्गा भगत, देवलन बोपचे, शोभा बिसेन, यमु नंदेश्वर, चंद्रकला कटरे, कल्पना रिनाईत, वनमाला डाहाके, गौरी जोशी, सुमती पांडे, पुष्पा भांडारकर व इतर महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बौद्धिक खेळ, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. संचालन मेघा बिसेन यांनी केले. आभार जानकी पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी मीनाक्षी ठाकरे, सुजाता बिसेन, जयश्री बिसेन, सुमन बिसेन यांनी सहकार्य केले.