शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

समाजाला संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:46 IST

आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसंजय पुराम : तेली समाज मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी तेली समाजानेसुद्धा संघटित व्हावे, असे उद्गार तेली समाज मेळाव्याप्रसंगी आ. संजय पुराम यांनी काढले.विदर्भ तेली समाज महासंघ आमगावच्या वतीने आदर्श विद्यालयात रविवारी तेली समाज मेळावा व विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम. करमकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून आयएएस मिशन अमरावतीचे संचालक नरेशचंद्र काथोले, नागपूरचे तेली समाज संशोधक डॉ. महेंद्र धावडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. केशव मानकर, शिवाजी संकुलचे संचालक झामसिंग येरणे, पं.स. सदस्य जसवंत बावणकर, प्रा. सुभाष आकरे, प्राचार्य सागर काटेखाये, कालीमाटीचे लिलाधर गिºहेपुंजे, शंकरराव क्षीरसागर, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव सुकचंद येरणे, स्वागताध्यक्ष भास्कर येरणे, प्रा. किशोर निखाडे, डॉ. बावणकर, भेलावे, प्रेम भेलावे उपस्थित होते.तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दरम्यान विद्यार्थ्यांसाठी रांगोली, भावगीत, नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गीतांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकरिता करावयाची तयारी, या विषयावर नरेशचंद्र काथोले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, नेमके अभ्यासाचे तंत्र कसे विकसित करावे याबाबत मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलत असून ओबीसींनी संघटित होवून आपल्या हक्कासाठी व आरक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचे मत प्रा. धावडे यांनी व्यक्त केले.दरम्यान तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी व अनेक गावांतील नवनियुक्त सरपंच यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पोलीस विभागातील जयंत हुकरे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष भास्कर येरणे यांनी केले.प्रास्ताविक आमगाव शाखेचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर पडोळे यांनी मांडले. संचालन प्रा. भेलावे यांनी केले. आभार कुवरलाल कुरंजेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी किशोर निखाडे, राजीव वंजारी, जानकीप्रसाद हटवार, विजय भुसारी, भाऊराव हटवार, जगदीश बडवाईक, जयंत उखरे, महेश वैद्य, आनंद येरणे, गोवर्धन वैरागडे, रामकृष्ण भेलावे, घनशाम साठवणे, प्रा. जिभकाटे, मनोहर बावनकर, उमेश आगाशे व तेली समाजाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.