शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:45 IST

भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे रितीरिवाज व पंरपरा वेगळ्या असल्या तरी अनेकतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर एकात्मता जपणारा देश म्हणून पाहते.

ठळक मुद्देकमलनाथ : मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम, १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे रितीरिवाज व पंरपरा वेगळ्या असल्या तरी अनेकतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर एकात्मता जपणारा देश म्हणून पाहते. त्यामुळेच प्रत्येकाने आपली संस्कृती आणि मुल्य जोपासून संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता संजय दत्त, प्रसिध्द उद्योगपती वेदांना ग्रुपचे अनिल अग्रवाल, किरण अग्रवाल व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल हे होते. या वेळी मध्यप्रदेशचे खनिकर्म मंत्री प्रदीप जायस्वाल, मध्यप्रदेश विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे, खा.मधुकर कुकडे, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, विलास श्रृंगारपवार, टामलाल सहारे, माजी खा.विश्वेश्वर भगत, आ. संजय उईके, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, मनोहरभाई पटेल केवळ राजकिय नेते नव्हे तर सामाजिक नेते होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण संस्थाची स्थापना केली. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खºया अर्थाने दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रफुल्ल पटेल यांनी सुध्दा शैक्षणिक संस्थाचा विस्तार करुन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. गोंदिया जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण संस्था असल्याचा गौरव वाटत असल्याचे सांगितले.प्रफुल्ल पटेल म्हणाले, कमलनाथ जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनेक योजना मार्गी लावण्यासाठी मदत केली. त्यांच्यामुळे गोंदिया येथे कोट्यवधी रुपयांच्या अंडरग्राऊंड योजनेला मंजुरी मिळाली. यापुढेही त्यांचे या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निश्चित सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मधुकर कुकडे म्हणाले कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्याने भंडारा जिल्ह्यातील बाघोली प्रकल्प मार्गी लागेल असा आत्मविश्वास आता निर्माण झाला असल्याचे सांगितले. गोपाल अग्रवाल म्हणाले यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री गोंदियाचे जावई होते. मात्र त्यांच्या कार्यकाळात डांर्गोली सिंचन प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. मात्र आता मुख्यमंत्री कमलनाथ असल्याने तो निश्चितपणे मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला. नाना पटोले यांनी महाराष्टÑातील विद्यमान सरकार शैक्षणिक संस्थामध्ये सुध्दा भेदभाव करीत आहे. मात्र सर्व शैक्षणिक संस्थानी हा प्रयत्न हानून पाडून शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र जैन यांनी केले.या गुणवंतांचा सत्कारशालांत तसेच उच्च माध्यमिक आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण देऊन गौरविन्यात आले. यात गुजराती नॅशनल हायस्कुलची विद्यार्थिनी मेघा बिसेन, अर्जुनी मोरगाव येथील जी.एम.बी.हायस्कुलची अवंती राऊत, शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ विद्यालयाचा समर्थ वरु, सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा जयंत लोणारे, एनएमडी विद्यालयाची विद्यार्थिनी रक्षदा पशिने, संदेश केडिया, तिरोडा येथील सी.जे.पटेल विद्यालयाची कल्पना भगत, सानिया ताहिर अली हुसैन, शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाचा रितेश हर्षे, साकोली येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ विद्यालयाचा गुलशन शहारे, भंडारा येथील जे.एम.पटेल विद्यालयाची निलीमा चौधरी व प्रज्वल राजपूत, एमआयटी शहापूरची विद्यार्थिनी साक्षी घावले, जागृती अग्रवाल यांचा समावेश होता.दोन्ही जिल्ह्यांसाठी भावनिक मागणीमनोहरभाई पटेल जयंती निमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि वेदांता ग्रुपचे प्रसिध्द उद्योजक अनिल अग्रवाल हे गोंदिया येथे आले होते. या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी कमलनाथ व अग्रवाल यांच्याकडे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी मोठे उद्योग स्थापन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगडप्रमाणेच महाराष्टÑातील शेतकºयांना सुध्दा धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करण्याची भावनिक मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली. कमलनाथ यांनी यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील युवकांना रोजगार -अग्रवालगोंदियांचे आंतरीक आणि बाह्य सौंदर्य पाहुन आपण खरोखरच गोंदियाच्या प्रेमात पडलो.गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित या जिल्ह्यात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था पाहुन मला आश्चर्य वाटले. वेदांता ग्रुपच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात कुठला उद्योग सुरू करता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार. तसेच पुढील वर्षी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आपल्या उद्योगात रोजगार देण्यासाठी मुलाखती घेऊन संधी देण्याची ग्वाही वेदांता उद्योग समुहाचे अनिल अग्रवाल यांनी दिली.वर्षा पटेल यांना उमेदवारी देऊन टाकाप्रफुल्ल पटेल यांच्याप्रमाणेच वर्षा पटेल यांनी मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्याशी जुडल्या आहेत. त्या प्रत्येकाशी आदरभावाने वागत असून सर्वांना ओळखत असल्याचे आपण पाहिले. त्यांचा व्यापक जनसंपर्क पाहता आगामी निवडणुकीत वर्षा पटेल यांना उमेदवारी देऊन टाका असा विनोदात्मक सल्ला उद्योजक विनोद अग्रवाल यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला.ये माँ कितना तोला, बोले तो पच्चास तोला.....संजय दत्त यांनी उपस्थितांचे प्रेम पाहुन त्यांचा आदर करीत वास्तव चित्रपटातील एक डॉयलाग सादर केला. ये माँ क्या टुकुर टुकुर देख रही.... ये कितने तोला है मालूम है क्या पुरा पच्चास तोला, कितना तोला पच्चास तोला हा डॉयलाग सादर करताच उपस्थितांनी संजूबाबा संजूबाबा अशा घोषणा दिल्या. तसेच मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील काही डॉगलाग सादर करुन उपस्थितांचे मन जिंकून घेतले.संजूबाबाला स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रुटची भूरळगोंदिया जिल्ह्यात स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फळाची शेती होत असल्याची कल्पना आपण केली नव्हती. मात्र येथे आल्यानंतर वर्षा पटेल यांनी स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट चाखण्यास दिले. यावर संजय दत्त यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाभी यहा की स्ट्राबेरी बोले तो एकदम झकास....असे सांगितले. आपण जेव्हा केव्हा येऊ तेव्हा निश्चित यांची मागणी करु असे सिनेअभिनेता संजय दत्त यांनी सांगितले. तसेच गोंदिया जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून लोनावळा, खंडाळा जाण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल यांनी फिल्म गोंदिया जिल्ह्यात चित्रपट नगरी स्थापन करण्यासाठी पुढाकार हा परिसर सुध्दा फिल्म फ्रेन्डली करण्याची मागणी केली.

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्तprafull patelप्रफुल्ल पटेल