तिरोडा : १९व्या शतकात बिरसा मुंडा यांनी झारखंडमध्ये मोठी क्रांती घडवत मुंडा समाजाच्या उलगुलान आंदोलनची उभारणी करत मानवसेवा केली. त्यांच्या या जीवनीतून नागरिकांना बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रविकांत बोपचे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम खैरबोडी येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या मूर्तीच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले होते. याप्रसंगी मनोज डोंगरे, शिशुपाल पटले, योगेश कटरे, गौतमा मेश्राम, संदीप खंडाते, संतोष पारधी, आंचल चंद्रिकापुरे, छेदीलाल पारधी, अरुणा सोयम, सीमा कटरे, दिलेश्वरी टेंभरे, छबिता टेंभरे, चंद्रप्रकाश सोयम, उमाशंकर खूळसाम, तुकाराम मरसकोल्हे, हेमेंद्र वलके, जयंत परतेती, जगदीश परतेती, शकुंतला मरसकोल्हे व गावकरी उपस्थित होते.