शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्राला सहकार्याची गरज

By admin | Updated: September 5, 2015 02:19 IST

दरवर्षी शेतकरी मोठया संख्येने कृषि विज्ञान केंद्र साकोलीला भेट देतात. त्याच्याच सहकार्याने शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी कृषी केंद्राला मदत होते.

साकोली : दरवर्षी शेतकरी मोठया संख्येने कृषि विज्ञान केंद्र साकोलीला भेट देतात. त्याच्याच सहकार्याने शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी कृषी केंद्राला मदत होते. भविष्यात सुध्दा शेतकऱ्यांचा असाच प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन अकोलाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राच्या ११ व्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोलाचे विस्तार शिक्षण तज्ज्ञसंचालक डॉ. पी.जी. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चारी अप्पाजी, सिंदेवाही विभागीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. डी. व्ही. दुर्गे तसचे भंडारा जिल्हयातील विविध विभागाचे विभाग प्रमुखासह शेतकरी कैलाश गेडाम, अ‍ॅड. आशिष खेडीकर, नाबार्डचे अरविंद खापर्डे, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, डॉ. उषा डोंगरवार, कृषि भुषण शेतकरी प्राणहंस मेहर, मिलिंद गुऱ्हेकर, प्रगतीशील शेतकरी या बैठकीचे सदस्य म्हणून उपस्थित होते.डॉ. उषा डोंगरवार यांनी १० व्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेच्या निर्णयावरील कार्यवाही सादर केली. त्यानंतर एप्रिल २०१३ ते मार्च २०१५ दरम्यान राबविण्यात आलेल्या व २०१५-१६ मधिल प्रास्ताविक कार्यक्रमाचे चलचित्राद्वारे प्रस्तुतीकरण केले. डॉ. चारी अप्पाजी यांनी कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे अंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावर प्रयोग, प्रथम रेशीम पिके प्रात्याक्षिके आणि सर्व कार्यक्रमामध्ये आत्माचा फार महत्वाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना संदेश मिळावेत, याकरिता शेतकऱ्याचे मोबाईल नंबर किसान पोर्टलवर नोंदवावेत पीक संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा २००१ मध्ये शेतकऱ्यांनी त्यांचेकडे उपलब्ध वाणांची नोंदणी करावी. कृषी विज्ञान केंद्राने पिक संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत दोन कार्यक्रम आयोजित करावे व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे घेण्यात आलेले प्रशिक्षण व इतर कार्यक्रमाचा अवलंब प्रत्येक वर्षी करावे असे सांगितले.डॉ. इंगोले म्हणाले, फिरते माती परिक्षण प्रयोगशाळा चालविण्याकरिता निधी उपलब्ध नाही आणि या केंद्रावरील पदे रिक्त आहेत. यावर्षी माती परिक्षणाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजना या प्रकल्पामधून सोय करण्यात आली आहे. संचालन व आभार प्रदर्शन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)