शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत उभारण्याची गरज- आठवले

By admin | Updated: June 1, 2017 01:07 IST

सम्राट अशोकाने बुध्द धम्माचा स्वीकार केल्यांतर बुध्द धम्माचा प्रचार-प्रसारही जगभर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बुध्द धम्म स्वीकारला.

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : सम्राट अशोकाने बुध्द धम्माचा स्वीकार केल्यांतर बुध्द धम्माचा प्रचार-प्रसारही जगभर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बुध्द धम्म स्वीकारला. संपूर्ण भारत बौध्दमय करणार असे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत उभा करण्याकरीता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. कोहमारा येथे आयोजित भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी म्हणून महोथेरो भदंत राहुल बोधी, जि.प.उपाध्यक्षा रचना गहाणे, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, जि.प.सदस्या माधुरी पातोडे, शिला चव्हाण, आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, भूपेंद्र गणवीर, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, भंते संघधातू, राजेश कठाणे, वसंत गहाणे, रोशन बडोले, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, नायब तहसीलदार मेश्राम, गटविकास अधिकारी लोकरे, रतन वासनिक, प्रदीपसिंह ठाकूर, डी.जी.रंगारी, हेमंत भांडारकर, नितीन गजभिये, सरपंच माया उके, उपसरपंच प्रल्हाद वरठे, पोलीस पाटील अनिल दिक्षीत, शालिनी डोंगरे उपस्थित होते. ना. आठवले पुढे म्हणाले की, डॉ, आंबेडकरांच्या स्वप्नातील गाव उभा राहील तेव्हाच भारत उभा करता येईल. यासाठी आर्थिक विषमतेला दूर सारणे गरजेचे आहे. याशिवाय आर्थीक समता प्रस्थापित होणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा विचार केला जात नाही. अजूनही आर्थिक, धार्मिक, सामाजिक समता निर्माण झाली नाही. आजही जाती-जातीमध्ये दंगली आणि भांडण सुरु आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतले तरच त्याला स्वत:ची प्रगती करता येणार अस म्हणाले. शाक्यमुनी बुध्द विहारातील गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भंते यांना चिवरदान देण्यात आले.