शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गरज ११ व्हेंटीलेटरची; काम भागवितात दोनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:24 IST

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असून रुग्णालयात विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ११ वेंटीलेटरची गरज असताना मात्र केवळ दोन व्हेंटिलेटरवर काम भागविले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देकेटीएस रुग्णालय : चार महिन्यांपासून पुरवठा नाही, रुग्णांच्या जीवाशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असून रुग्णालयात विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ११ वेंटीलेटरची गरज असताना मात्र केवळ दोन व्हेंटिलेटरवर काम भागविले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आले. यामुळे रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळतील ही अपेक्षा होती. मात्र आता येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून सुध्दा रुग्णांना आरोग्याविषयक सोयी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.सीटीस्कॅन, रक्ततपासणी सारख्या सेवा बंद राहत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केटीएस रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या चारशेच्या वर आहे. त्या दृष्टीने रुग्णालयाने २०१३ मध्ये ६ वेंटीलेटर घेतले होते. तसेच याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नागपूर येथील एका कंपनीला दिली. मात्र सहापैकी सध्या स्थितीत केवळ दोनच वेंटीलेटर सुरू असून ४ वेंटीलेटर नादुरूस्त आहे. मात्र अद्यापही त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वेंटीलेटरवर काम सुरू आहे.एखाद्यावेळेस अतिदक्षता गृहात रुग्णांची संख्या वाढल्यास काय होणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मागील तीन वर्षांपासून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी वेंटीलेटरची समस्या लक्षात घेवून ७ नवीन वेंटीलेटर खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून चार महिन्यापूर्वीच पैसे देखील प्राप्त झाले. त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या हॉपकिन्स कंपनीकडे वेंटीलेटर खरेदीसाठी पैसे भरले मात्र या कंपनीने अद्यापही व्हेंटिलेटरचा पुरवठा केला नाही. त्यामुळे केवळ दोनच वेंटीलेटरवर रुग्णालयाचे काम सुरु आहे.तर वेंटीलेटर देखभाल दुरूस्तीचे कंत्राट घेतलेल्या नागपूर येथील कंपनीने ३ वेंटीलेटर दोन तीन दिवसात दुरूस्ती करुन पाठविणार असल्याचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.एकंदरीत केटीएस रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाºया सर्वच सुविधा आॅल ईज वेल नसल्याचे चित्र असून याकडे आरोग्य विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासणारकेटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे हे इंजेक्शन नेमके येथे आणले कोणी याचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चौकशी समिती करणार असल्याची माहिती आहे.मुदतबाह्य इंजेक्शन आले कुठूनयेथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोन प्रकारचे मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना पाच दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती. त्यानंतर रुग्णालयात चांगली खळबळ उडाली होतीे. मात्र रुग्णालयात आढळलेले ते दोन्ही इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरुन आल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे. रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शनचे बॅच क्रमांक आणि आढळलेल्या इंजेक्शनचे बॅच क्रमांक यात तफावत असून अतिदक्षता विभागात हे मुदतबाह्य इंजेक्शन नेले कुणी याचा शोध रुग्णालय व्यवस्थापन घेत आहे.रुग्णालयातील वेंटीलेटरची समस्या लक्षात घेवून चार महिन्यापूर्वीच खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच नवीन ७ वेंटीलेटरचा पुरवठा हॉपकिन्स कंपनीकडून रुग्णालयाला होईल. तसेच मुदतबाह्य इंजेक्शन प्रकरणाची सुध्दा चौकशी सुरु असून लवकरच याचा अहवाल देण्यात येईल.-व्ही.पी.रुखमोडे,अधिष्ठाताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय.