गोंदिया : आपत्तीच्या काळात नागरिकांनी न घाबरता दक्षता घेणे महत्वाचे आहे. घरात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या बॉटल्स, थर्माकोल, व्हॉलीबॉल, बांबू, दोरी अशा अनेक घरगुती वस्तुंचा उपयोग करून आपत्तीच्या वेळेत आपले रक्षण करता येते. आपत्तीचे स्वरूप लहान किंवा मोठे असले तरीही नियोजन महत्वाचे असे तिरोडाचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील पाटबंधारे विभागाच्या तलावावर एनडीआरएफ पुणेच्या चमुने आयोजित केलेल्या प्रात्याक्षिकप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला तहसीलदार रविंद्र चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, प्रवीणकुमार, तिरोडाचे पोलीस निरिक्षक संदीप काळे, एनडीआरएफ पुणेचे मेजर दुलीचंद, मेजर ददन तिवारी, नायब तहसिलदार सतीश मासाळ, सोमनाथ माळी, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, श्रीधर फडके, तिरोडा व गोरेगाव येथील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)नवेगावबांध तलावावरही प्रात्यक्षिकआपत्तीचे पूर्वनियोजन करण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील तलावावर एनडीआरएफ पुणेच्या चमुने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार प्रशांत घोरु डे, नवेबावबांधच्या सरपंच लिना डोंगरवार, नायब तहसिलदार विलास कोकवार, ए.आर.मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी राऊत, उपविभागीय अभियंता देशमुख, राकेश डोंगरे, बी.टी.यावलकर, नवेगावबांधचे पोलीस निरिक्षक डोहरे, अर्जुनी/मोरगावचे पोलीस उपनिरिक्षक कोहळी यांच्यासह होमगार्ड, वन विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच जमुनालाल लोहिया विद्यालय सौंदड व जि.प.ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
एनडीआरएफ चमुची प्रात्याक्षिके
By admin | Updated: October 5, 2016 01:08 IST