शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचे नामांकन दाखल

By admin | Updated: November 3, 2016 02:46 IST

गोंदिया विधान परिषद निवडणूक : अपक्ष व शिवसेनेच्या मतांवर नजर, निवडणूक चुरशीची होणार

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : अपक्ष व शिवसेनेच्या मतांवर नजर, निवडणूक चुरशीची होणार गोंदिया : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी बुधवारला दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन दाखल करण्यापूर्वी लक्ष्मी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जैन म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत सदस्य आणि सहयोगी सदस्यांची एकजुट आहे. या निवडणुकीत आपण बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी आमदार दिलीप बनसोड, भंडारा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, गोंदिया राकाँचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सुनिल फुंडे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, भंडाराचे नगराध्यक्ष बाबूराव बागडे, तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, पवनीच्या नगराध्यक्ष रजनी मोटघरे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, नगरसेवक महेंद्र गडकरी, भगवान बावनकर, रुबी चढ्ढा, धनराज साठवणे, निखील जैन, मुन्ना जैन, नरेश माहेश्वरी, विलास काटेखाये, लवली वोरा, शैलेश वासनिक, अविनाश जैयस्वाल, नरेश कुंभारे, जिब्राईल पठाण, गोपीचंद थवानी, अविनाश ब्राम्हणकर, विजय डेकाटे, जनकराज गुप्ता, गंगाधर परशुरामकर, राजू व्यास, मकसूद खान, माणिक गायधने, सुनिल साखरकर, मधुकर चौधरी, सुमेध सुरेखा जनबंधू, कैलाश नशिने, शिव शर्मा, अशोक सहारे, अशोक गुप्ता, लखन बहेलिया, राहुल दवे, भैयू चौबे, हरी त्रिवेदी, चंचल चौबे, कैलाश पटले, सतीश देशमुख, दिनेश अग्रवाल, श्रीकांत वैरागडे, मकसुद पटेल, शैजादा खान, हेमंत महाकाळकर, राम गाजीमवार, स्वप्नील नशिने, नरेंद्र बुरडे, परवेज पटेल, नितीन तुमाने, राजू हाजी सलाम, विजय खेडीकर, पंकज ठवकर, शेखर गभणे, धनंजय सपकाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) ९ उमेदवारांचे १३ नामांकन दाखल ४उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांचे १३ नामांकन दाखल झाले आहे. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी ३ नामांकन अर्ज, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र हिरालाल जैन यांनी ३ नामांकन अर्ज, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.परिणय रमेश फुके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निखिल राजेंद्र जैन यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. याशिवाय अपक्ष विष्णुकुमार गणेशलाल अग्रवाल, अमित अनिलकुमार जैन, देवेंद्र राधेश्याम तिवारी, अरूणकुमार शिवकुमार दुबे, नितीश नरेशचंद्र शहा यांनी नामांकन दाखल केले आहे, असे ९ उमेदवारांचे १३ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तिन्ही बलाढ्य उमेदवार ४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे रिंगणातील तिन्ही उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे. अपक्ष आणि शिवसेनेची अधिकाधिक मते खेचण्याकडे तिन्ही उमेदवारांनी भर दिला आहे.