शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

By admin | Updated: July 26, 2015 02:05 IST

प्रेम प्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा युक्तीवाद करुन देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आपण व आपला भारतीय जनता पक्ष ...

गोंदिया : प्रेम प्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा युक्तीवाद करुन देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आपण व आपला भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्याप्रति किती आश्वस्त आहे हे दाखवून आपल्या निर्लज्जपणाचे दर्शन देशाला घडविले आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करीत असून या देशातील जनतेसाठी संवेदनशील असलेल्या राधामोहनसिंह यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा निषेध करीत असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविले.संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यसभेत शेतकऱ्यांचे प्रश्नावर चर्चेत भाग घेताना भारत सरकारचे कृषी मंत्री राधामोहन सिंह हुड्डा यांनी या वर्षभरात १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून या आत्महत्या प्रेमप्रकरण, अपत्य न होणे, कौटुंबिक कलह या कारणामुळे झालेल्या आहेत असे बेजबाबदारपणाचे विधान करुन सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. या आत्महत्या प्रेमप्रकरणामुळे व कौटुंबिक कलहातून झाल्या असतील तर विरोधी बाकावर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यात सरकार दोषी आहे. सरकारची कृषी निती दोषी आहे. म्हणून आत्महत्या होत आहेत, असे सांगून अनेकदा लोकसभा, राज्यसभा व राज्यात विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज दिवस-दिवस बंद पाडण्यात येत होते. तेव्हा प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या होतात हे त्यांना समजले नव्हते का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे भाजपाचे देशातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांप्रति किती जागरुक आहे हे स्पष्ट होते. कृषी मंत्री राधामोहन सिंह हुड्डा यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध करीत असून त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे परशुरामकर म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)