शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नक्षल व अतिरिक्त घरभाडे भत्ता लवकरच लागू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे ...

ठळक मुद्देप्रदिप डांगे : शिक्षक समितीने तक्रार निवारण सभेत घडवून आणली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांना दिले निवेदन देवून तक्रार निवारण सभेत चर्चा घडवून आणली. यावेळी नक्षलभत्ता कमालमर्यादेत १५०० रूपये व अतिरिक्त घरभाडे संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल असे आश्वासन डांगे यांनी तक्रार निवारण सभेत दिले.सभेला नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल.पुराम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमृता परदेशी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)आर.पी.रामटेके, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.मालाधारी, शिक्षण विभाग अधीक्षक जनबंधू व इतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदिप तिडके, जिल्हा संघटक एन. बी. बिसेन, तालुकाध्यक्ष रोशन म्हस्करे, तालूका संघटक सचिन सांगळे यांनी २५ प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. यात जीपीएफ-डिसीपीएस मार्च २०२० पर्यंतचा हिशोब मिळणे हा प्रश्न आक्रमक पणे ठेवण्यात आला. यावर डांगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व १० जणांचे यूनिट तयार करून कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढले जाणार असल्याचे सांगीतले.तसेच सीएमपी वेतनप्रणाली लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, २ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लावणे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, १२ वर्षे झालेल्यांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व २४ वर्षे झालेल्यांना निवड श्रेणी मंजूर करण्यात यावी, उच्च परिक्षेला बसण्याची परवानगी व कार्येत्तर परवानगी आदेश काढण्यात यावे, ४% सादीलवार राशी शाळांना देण्यात यावी, २००९ नंतर नोकरीत लागलेल्या शिक्षकांना सेवेत कायम करण्यात यावे, कोविड-१९ अंतर्गत कामावर असताना मरण पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावा, जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर वेतन वाढीची राशी वसूल करण्यात येवू नये, ओबीसी-एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे (२०१९-२०) कोरोनामुळे राहिलेले प्रस्ताव समाज कल्याण विभागात घेण्यात यावे, पदविधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करणे, सेवापूस्तक गहाळ झालेल्या शिक्षकांना नवीन सेवापूस्तक मंजूर करून देणे आदी प्रश्नांवर चर्चा घडविण्यात आली. सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचे आश्वासन डांगे यांनी दिले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी