शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विकास नाही म्हणून नक्षलवाद

By admin | Updated: March 18, 2016 02:02 IST

विकास नव्हता म्हणून नक्षलवादी आला होता. परंतु आज मात्र शासन सर्वाधिक विकासावर भर देत आहे. ते विकास नक्षलवाद्यांना पहावासे वाटत नाही.

संदीप पखाले : बोंडगाव-सुरबन येथील जनजागरण मेळाव्याची सांगता गोठणगाव : विकास नव्हता म्हणून नक्षलवादी आला होता. परंतु आज मात्र शासन सर्वाधिक विकासावर भर देत आहे. ते विकास नक्षलवाद्यांना पहावासे वाटत नाही. याकरिता नक्षलवाद्यांनी सुडाची भूमिका घेतली. विकास कामे करणाऱ्या कंपन्यांचे साहित्य, ग्रामपंचायत रेकार्ड, वन संपत्ती जाळण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी १४-१५ वर्षांच्या तरुण-तरुणींनी नक्षलवाद सोडून विकासाच्या मुख्यप्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले याांनी केले.पोलीस ठाणे केशोरीअंतर्गत येणाऱ्या एओपी गोठणगावद्वारे दोन दिवशी जनजागरण मेळावा बोंडगाव-सुरबन येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर १५ व १६ ला घेण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले होते. अतिथी म्हणून नायब तहसीलदार गावळ, सहायक खंड विकास अधिकारी मंगल जाधव, पंचायत समिती सदस्य सुशील हलमारे, ठाणेदार भस्मे, पाटील, पोलीस पाटील कवडू हलमारे, सरपंच रोशन शहारे मंचावर उपस्थित होते.सहायक खंड विकास अधिकारी मंगल जाधव यांनी एकात्मिक योजना, घरकूल योजना, विशेष घटक योजना यासंबंधी माहिती दिली. नायब तहसीलदार गावळ यांनी संजय गांधी निराधार, वृद्धपकाळ योजना, आर्थिक सहाय्य योजना याबाबद माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. पखाले पुढे म्हणाले, जनजागरण म्हणजे अति दुर्गम डोंगरदऱ्यात राहणाऱ्यांना शासनाच्या योजनासंबंधी माहिती व्हावी, यासाठी जनजागरण मेळावे घेतले जातात. त्या परिसरातील १४-१५ वयोगटातील युवक-युवतींना नक्षल चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात. हातात बंदूक देवून गुन्हे घडवितात. गुन्हा घडल्यानंतर नक्षल चळवळीतून पळून गेल्यास असेच गुन्हे तुमच्यावर केले जातील, अशी भीती दाखवून नक्षल चळवळमध्ये सक्रीय होण्यास भाग पाडतात. परंतु भटकलेल्या तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मसमर्पण करण्याच्या योजनेत सामील होण्याचे आवाहन केले. नक्षलवाद हा सन १९७० मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलवाद या गावातून झाला. हळूहळू १९८०-९० मध्ये शासनाच्या विरोधात नृत्य, नाटका दाखवून नागरिकांना नक्षलवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले.बक्षीस वितरणयाप्रसंगी निरनिराळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार जयश्री बाळबुद्धे, द्वितीय नलिनी, सायकल स्पर्धेचे प्रथम बक्षीस समीर घुघुसकर, द्वितीय पंकज हलामे, सामान्य ज्ञान स्पर्धा रहात मुन्ना सय्यद, मंगेश ताराम, संगीत खुर्ची प्रथम वजीता मेश्राम व मनिषा हलमारे, चमचा गोळीमध्ये संज्ञा इश्वार, आकाश भोपे, निशा दखणे, संगीता नैताम, कबड्डी स्पर्धा महिला संघ कढोली, गोठणगाव, बोंडगाव (सुरबन), कबड्डी स्पर्धा पुरुष प्रथम जांभळी, सुरबन, गोठणगाव या संघाना देण्यात आले. योजनांचे लाभ मानव विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी विकास हायस्कुल गोठणगावच्या विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप विशेष घटक योजनेचा लाभ बालू शहारे, परमानंद शहारे, जोशी डोंगरवार, रविकांत हलमारे, रामगोपाल पडोती, भागरथा कोवे, सूर्यकुमार तिरपुडे, महेश शहारे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे ताडपत्र्यांचे वाटप शामराव कोरेटी कढोली, बकाराम कोडापे बोंडगाव, काटेरी तार तर एसडीपीई पाईस वासुदेव कन्नाके यांना देण्यात आले.रोगनिदान शिबिरप्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ३१० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत औषध देण्यात आले. रुग्णांची तपासणी डॉ. बोदेले व त्यांच्या चमूने केले. मेळाव्यास्थळी नक्षल विरोधी व आत्मसमर्पण सेल देवरी यांच्याकडून स्टॉल लावण्यात आले. कृषी प्रदर्शनामध्ये २०० शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्टॉल लावण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प देवरीच्या स्टॉलवर २५ नागरिकांनी भेटी दिल्या व योजना समजावून घेतल्या. शेतकऱ्यांना कर्जासंबंधी माहिती एचडीएफसी बँक केशोरीद्वारे देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमजि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बोंडगाव, जि.प. प्राथमिक शाळा गंधारी, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा प्रतापगड, दिनकरनगर, जि.प. शाळा गोठणगाव यांनी रंगी-बेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आभार पोलीस निरीक्षक भवमे यांनी मानले.