शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध पर्यटन संकूल; निधी असूनही पर्यटन विकासात खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:16 IST

नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तारीख पे तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. जिल्हा नियोजन विभागाच्या तारीख पे तारीख धोरणाचा येथील पर्यटन स्थळाच्या विकासावर परिणाम होत आहे.नवेगावबांध येथे तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दरवर्षी विदेशी पक्षी मोठ्या संख्येनी येतात. तर हा परिसर निसर्गरम्य असल्याने त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा सुध्दा मिळाला आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. यातून स्थानिकांना रोजगार व शासनाला महसूल प्राप्त होतो. हीच बाब हेरून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने नवेगावबांध फाऊंडेशनने पर्यटक संकुलाच्या विकासासाठी मागील तीन वर्षांपासून कंबर कसली. पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी फाऊंडेशनने पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे साकडे घातले. आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. त्यानंतर बडोले यांनी पाठपुरावा करुन पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला.हा निधी जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त सुध्दा झाला आहे. मात्र मागील वर्षभरापासून नियोजन विभागाला या निधीचे नियोजन करुन विकास कामे सुरू करण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी पर्यटन संकुल परिसरातील कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र यानंतरही अधिकाºयांनी ही बाब गांर्भियाने घेतली नाही. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराला भेट देवून कामे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते सुध्दा फोल ठरल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींचा मात्र येथील पर्यटन विकासावर परिणाम होत आहे.पर्यटकांचा हिरमोेड१९७१ साली राज्य शासनाने या परिसराला नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. तेव्हापासून एक वैभव संपन्न राष्ट्रीय उद्यान म्हणून नावारुपाला आले. देश, विदेशातून व राज्यातून लाखो पर्यटक येथे भेट देवू लागले. येथील प्राणी संग्रहालयामुळे राज्यातील शैक्षणिक सहलीचे हे राष्ट्रीय उद्यान एक प्रमुख केंद्र बनले. मनोहर उद्यान, हॉलीडे होम्स गार्डन,हिलटॉप गार्डन, बालोद्यान, वैभव गार्डन, संजय कुटी, जलाशयातील नोका विहार यामुळे हे राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.या कामांवर परिणामशासनाने मंजुर केलेल्या निधीतून जे. टी.पार्इंट रोपवे, हिलटॉप विश्रामगृह, शेगावच्या धर्तीवर गेट व रस्त्याचे सुशोभीकरण,इंटरपिटीशन सभागृह, अंतर्गत रस्ते व बगीच्याचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, नैसर्गिक पायवाट, तलावाशेजारी बीच, जे.टी.पार्इंटवर बैठक व्यवस्था, अ‍ॅडव्हांटेज स्पोर्ट आदी कामे केली जाणार होती.

टॅग्स :tourismपर्यटन