शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील गाईडला नव्याने नोंदणीची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:35 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला.

ठळक मुद्देपर्यटकांची गैरसोय : वनांची सुरक्षा वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला. तर २००६ ला आम्ही रितसर नोंदणी केली आहे. वारंवार नोंदणी नको म्हणून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील सर्व गाईडनी पुन्हा नोंदणी करण्यास नकार दिला आहे.वनपरिक्षेत्राधिकारी राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध यांनी १० मार्चपासून गाईडना नोंदणीचे कारण देत प्रवेश नाकारला आहे. परिणामी गाईड अभावी बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. तर इकडे राष्ट्रीय उद्यानाच्या सरंक्षणासाठी असलेल्या वनरक्षक व स्थायी-अस्याथी वनमजुरांना पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी कामाला लावण्यात आल्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणावर प्रश्च चिन्ह निर्माण झाला आहे. २९ मार्च २००६ ला वन्यजीव संरक्षण विभागाने रितसर जाहीरात काढून गाईड्सची भर्ती केली होती. तसेच प्रशिक्षण देऊन ओळखपत्रे दिली. त्यानुसार आजपर्यंत आम्ही गाईडचे (पर्यटक मार्गदर्शक) काम करीत आहोत. मग दरवर्षी १०० रुपये शुल्क भरुन नव्याने नोंदणी करण्याची गरज काय? असा सवाल गाईड संजय शहारे यांनी उपस्थित केला आहे. १६ मार्चला कलकत्ता येथील विज्ञान महाविद्यालयाचे पर्यटक राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायला आले होते. परंतु गाईडना १० मार्चपासून गेटवर प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे खोली गेटवर एकही गाईड नव्हते. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत दीड तास पर्यटकांना गेटवर ताटकळत उभे रहावे लागले. नंतर राष्ट्रीेय उद्यान नवेगावबांध येथील संरक्षणासाठी नियुक्त असलेल्या दोन वनरक्षक व एक वनमजुराला पर्यटकांना मार्गदर्शनाच्या कामाला लावण्यात आले. तेव्हा कुठे कलकत्याच्या पर्यटकांना राष्ट्रीय उद्यानात भ्रमतीसाठी जाता आले. जांभळी, बकी गेटवरही हेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रीय उद्यानाच्या वन व वन्यजीवाच्या संरक्षणासाठी वनरक्षक व वनमजुरांची नियुक्ती असतांना त्याना पर्यटकांचे मार्गदर्शन म्हणून कामाला लावल्याने वन व वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गाईडवर उपासमारीची पाळीवन व वन्यजीवसंरक्षणाचे काम सोडून वनरक्षक व स्थायी-अस्याथी वनमजुरांना पर्यटकांचे मार्गदर्शन करावे लागत आहे. तर दुसरीकडे नव्याने नोंदणी प्रतिष्ठानकडे केलीे नाही म्हणून प्रवेशद्वारावर गाईडना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.गाईडचे आंदोलन सुरूमहाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईडस युनियनच्या वतीने गाईडच्या सेवेत कायम करण्यात यावे, निश्चित वेतन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, गाईडसच्या भरतीत व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावातीलच युवक-युवतींना प्राधान्य द्यावे आदी मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे नव्याने नोंदणी केल्यास २००६ पासूनची आमची सेवा प्रभावीत होईल,अशी भिती गाईडनी व्यक्त केली आहे. आमच्या मागण्या पूर्ण होऊ नये व सेवेत कायम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी नव्याने नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान गोंदिया येथे नोंदणी करण्याचा हा शासनाचा डाव आहे. असा आरोप गाईड संजय शहारे यांनी केला आहे.नोंदणीची पूर्वसूचना नाहीवनपरिक्षेत्राधिकारी नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान यांनी ६ मार्चचे पत्र ११ मार्चला देऊन नव्याने नोंदणी करण्यास सांगीतले. पण त्यापूर्वी कुठलीही लेखी किंवा तोंडी सूचना त्यांनी न देता तुम्ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान गोंदियाची नवीन नोंदणी ६ मार्चपर्यंत करा तुम्ही प्रतिष्ठानकडे नोंदणी न केल्यामुळे १० मार्चपासून राष्ट्रीय उद्यानाच्या खोली,जांभळी, बकी या प्रवेशद्वारावर पर्यटक मार्गदर्शकांना प्रवेश देणे बंद केले आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य