शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावला वेगळी ओळख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 04:18 IST

निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने

गोंदिया : निसर्गाने भरभरु न दिल्याने गोंदिया जिल्हा वनसमृद्ध व जलसंपन्न आहे. नवेगावबांधचाही परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असून पर्यटनाच्या क्षेत्रात नवेगावबांधची आगळी-वेगळी ओळख निर्माण करू, असा विश्वास पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. रविवारी १० एप्रिल रोजी नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स परिसरात जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग पर्यटनस्थळ विकास मूलभूत सुविधा अंतर्गत ५६ लाख रूपयांच्या खर्चाचे तलाव सौंदर्यीकरण व बोटिंग सुविधासंबंधी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती काशीम जमा कुरेशी, पंचायत समिती सदस्य गुलाब कोरेटी, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, माजी सभापती प्रकाश गहाणे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील डोंगरवार, तहसीलदार बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, माजी पं.स. सदस्य महादेव बोरकर, उद्यान बचाव संघर्ष समितीचे नवल चांडक, विजय डोये, रामदास बोरकर, केवलदास पुस्तोडे यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट द्यावे यासाठी जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. राज्यात केवळ गोंदियात आढळणाऱ्या दुर्लभ व नामशेष होत चाललेल्या सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिसेंबरमध्ये सारस महोत्सव घेण्यात आला. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलावांवर हिवाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व विदेशी पक्षी येत असल्यामुळे हे तलाव पक्षी अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन सर्कीट म्हणून विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून बडोले म्हणाले, नवेगावबांध परिसरात ८ कोटी ५० लाख रु पये खर्चाचे रिसोर्ट बांधण्यात येईल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा १५ कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. नवेगावबांध येथे भविष्यात लवकरच बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पर्यटनस्थळांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. नवेगावबांध पर्यटनस्थळासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देखरेख समितीवर स्थानिकांना सहभागी करून घेण्यात येईल. नवेगावबांध येथे पक्षी अभयारण्य स्थापण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कापगते म्हणाले, वन्यजीवप्रेमी व अरण्ययात्री मारूती चितमपल्ली यांच्यामुळेच नवेगावबांधला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. येथे अनेक पशूपक्षांवर संशोधन होऊ शकते यावर चितमपल्ली यांनी सखोल अभ्यास केला आहे. नवेगावबांध येथील अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहे. नवेगावबांध अभयारण्यातील बोदराई, बदबदा व आगेझरी स्थळांचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गहाणे म्हणाल्या, नवेगावबांध पर्यटन स्थळाच्या विकास कामामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी स्थानिकांची मदत आवश्यक असून मदतीमुळेच भविष्यात पर्यटनस्थळांचा विकास करता येईल, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता ढोरे म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील. त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. ५६ लाख रूपये खर्चुन येथे चौपाटी, बोटिंगकरिता जेटी व धरणाच्या भिंतीचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्र माला नवेगावबांध येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. संचालन भेलावे यांनी केले. आभार व्ही.एम.श्रीवास्तव यांनी मानले.(प्रतिनिधी)