शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येत्या रविवारपासून सुरू होतोय नवतपा; काळजी घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:08 IST

येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनऊ दिवस उन्हाचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे.येत्या २५ तारखेपासून रोहिणी नक्षत्राची सुरूवात होत असून या नक्षत्रामध्ये सतत ९ दिवस सूर्यदेव आग ओकत असल्याने त्याला नवतपा या नावाने संबोधले जाते. या नवतपामध्ये शरीरातील उष्णतामान वाढून उष्माघाताचे नवे संकट निर्माण होऊ शकते. या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. उष्माघात हा आजार कोणालाही होवू शकतो. मानवी शरीराचे समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, शारिरीक कमजोरी वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, उलट्या होणे इत्यादी उष्माघाताची ही लक्षणे असून वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.तत्पूर्वी अशा रूग्णाला थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेत हलवावे, डोके व पाठीचा भाग समांतरपेक्षा थोड्या उंचावर ठेवावा. डोक्यावर थंडगार पाण्याच्या पट्या किंवा बर्फ ठेवावे. थोड्या-थोड्या अंतराने थंड पाणी पाजावे. या दरम्यान कसल्याही प्रकारचे गरम पदार्थ रूग्णाला देवू नये.रूग्णाच्या संपुर्ण शरीरावर थंड पाण्याचे कापड बांधावे असे डॉ. मंडल यांनी सांगीतले. उष्माघात टाळण्यासाठी शेतकरी किंवा शेतमजुरांनी सकाळी किंवा सायंकाळी शेतीची कामे करावी. भर उन्हात कोणतीही कामे करू नये. डोक्यावर दुपट्टा किंवा टोपी वापरावी. उष्माघात वयोवृद्ध, लठ्ठपणा, मधुमेह व आजार असणाऱ्यांना होण्याची दाट शक्यता असते. जागतिक महामारी कोरोना विषाणुच्या संकटाचा यशस्वी सामना करतानाच उष्माघाताचाही सामना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नवतपामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे डॉ. मंडल यांनी सांगितले.

टॅग्स :Temperatureतापमान