शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नवाटोलाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

By admin | Updated: May 13, 2017 01:37 IST

सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे.

संत तुकाराम वनग्राम योजना : विविध कामांची केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे. नुकतेच राज्यस्तरीय पथकाने गावाला भेट देऊन संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केलेल्या कामांची पाहणी केली. नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. त्या उपक्रम व धाडसी कार्यांची माहिती संकलीत करून तपासणी पथकासमोर सादर केली. समितीच्या कामामुळे नवाटोला, सोनारटोल, धनेगाव, कोसमतर्रा परिसरातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळाले आहे. समितीच्या अथक परिश्रमामुळेच हाजराफॉल सारखे नैसर्गिक पर्यटन स्थळ रोजगाराभिमुख बनले आहे. या व्यतिरीक्त वनोपजातून सुद्ध रोजगार व उत्पन्न प्राप्त करण्याची संधी स्थानिका लोकांना मिळाली आहे. राज्यस्तरीय पथकाने पाहणी करताना निवडीचे काही निकष ठेवले व त्यात वनीकरण, मृदा व जलसंधारण, श्रमदान, वनोत्तर पर्ययी इंधनाचा वापर, वनसरंक्षण, वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी पाणवठे तयार करणे, उपक्रमामध्ये स्त्रीयांचा सहभाग, आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा इत्यादी माध्यमातून केलेली जनजागृती या बाबींच समावेश होता. निकषानुसार पाहणी करताना समितीची कामे प्रशंसनीय दिसून आली. पथकामध्ये नागपूर येथील वन संरक्षक गिरीपूंजे, सामाजीक वनिकरणचे विभागीय वनाधिकारी ढेरे, सहायक वन संरक्षक तारसेकर व अन्य सदस्य होते. याप्रसंगी सरपंच पूजा वरकडे, जिल्ह्याचे सहायक वन संरक्षक यू.टी.बिसेन, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्र सहायक सी.जी.मडावी, वन रक्षक सुरेश रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदीन उईके तसेच समितीचे सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. यावेळी उप वनसंरक्षक एस.युवराज यांनी मार्गदर्शन केले. तर सोनारटोला येथील समाजभवनात तपासणी, स्वागत सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पथकाने वन क्षेत्रात जाऊन जंगलांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच समितीच्या उपक्रमांचीही तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कृत नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वन संवर्धन व वनांचे रक्षण करण्यासाठी सन २०१५-१६ चा वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वरूपात ५१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आला होता.