दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे. निसर्ग मंडळाने हलबीटोला नहराजवळील वनविभागाने लावलेल्या रोपट्यांना नजीकच्या नहरातून पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न केला.पर्जन्यामानात दिवसेंदिवस घट होत असताना अत्यल्प पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. पाणी मिळणे देखील अवघड झाले. अशा परिस्थितीत पाणी घालून झाडे जगविणे तर फारच कठीन काम आहे. परंतु पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी हार न मानता थेंब-थेंब पाण्याची बचत करुन लावलेली झाडे जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील निसर्ग मंडळाने वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे यांच्या पुढाकाराने २० युवकांचा गु्रप तयार केला आहे. गेल्या काही दिवसात या मंडळाने पर्यावरण संर्वधनाचे काम, वन्यप्राणी बचाव अभियान व स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी निसर्ग मंडळ लवकरच लोकवर्गणीतून टँकरची व्यवस्था करुन वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांना जगविण्याचा प्रयत्न करणार आहे.स्वच्छता अभियान मोहिमेला गतीपर्यावरण संवर्धनासह निसर्ग मंडळाने स्वच्छता मोहिमेला हातभार लावला आहे. गुरूवारी (दि.२) गतवर्षी वनविभागाने लावलेल्या अकराशे झाडांना पाणी देत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वडाच्या झाडाजवळील परिसराला स्वच्छ करण्यात आले. या वडाच्या झाडावर हजारो पक्ष्यांचे घरटे पहायला मिळाले. त्या झाडावर लवकरच पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. या वेळी निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, प्रसिद्धी प्रमुख दिलीप चव्हाण, सदस्य डॉ. लोकेश तुरकर यांनी सहकार्य केले.वाटसरुही उतरले स्वच्छता अभियानात२ मे २०१९ रोजी निसर्ग मंडळाने हलबीटोला येथील वडाच्या झाडाच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात केली असता रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुनांही आवरले आहे. त्यांनीही निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांना पाहून स्वत:ला स्वच्छता अभियानात सहभागी करुन घेतले.
झाडे जगविण्यासाठी निसर्ग मंडळाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:13 IST
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भूजल पातळीत सुद्धा घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईच्या काळातही पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग मंडळाकडून झाडे जगविण्यासाठी धडपड केली जात आहे.
झाडे जगविण्यासाठी निसर्ग मंडळाची धडपड
ठळक मुद्देराबविले स्वच्छता अभियान । झाडांनाही दिले पाणी