शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या व्यक्तींसाठी निसर्गही रडतो

By admin | Updated: May 5, 2016 01:54 IST

चेहऱ्यावर सदैव हास्य, मिळून कार्य करण्याची शैली, सहकार्य आणि सामंजस्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली.

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : दिलीप गावडे यांचा निरोप समारंभगोंदिया : चेहऱ्यावर सदैव हास्य, मिळून कार्य करण्याची शैली, सहकार्य आणि सामंजस्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. त्यांच्या नियोजनबध्द कार्यामुळेच जिल्हा परिषदेतून शासनाचा एकही पैसा परत गेला नाही. चांगली माणसे आपल्यामागे छाप सोडून जातात. अशा व्यक्तींसाठी निसर्गही रडत आहे, अशा भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांचे अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्त पदावर पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्यानिमित्त आयोजित समारंभात आपल्या भावना व्यक्त करताना अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात सोमवारी दुपारी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिचे सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण समितीचे सभापती विमल नागपुरे, कृषी व पशूसवंर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.ए. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रा.मा. चव्हाण, कार्यकारी अभियंता (बांधकाम) खांडरे, कार्यकारी अभियंता (लपा) पथाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) अंबादे, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी चव्हाण, समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) भांडारकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) नरड, शिक्षणाधिकारी (माध्य) फटे व सर्व गट विकास अधिकारी या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी महिला व बालकल्याण समितीचे सभापती विमल नागपुरे, कृषी व पशूसवंर्धन समितीचे सभापती छाया दसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.ए. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रा.मा. चव्हाण, गट विकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी मनोगत व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांच्या विविध गुणांचा उल्लेख करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडून तथा जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्यातर्फे दिलीप गावडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. शर्मा यांनी गीत सादर करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी केले. आभार वरिष्ठ लेखा अधिकारी विजय जवंजाळ यांनी मानले. कार्यक्रमात जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)सकारात्मक विचारातूनच मिळते प्रोत्साहनएखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असेल तर ती व्यक्ती प्रोत्साहन देण्याचे कार्य करतो. कोणतेही कार्य करायचे तर धडाडीने करायचे, अशा अनेक गुणांचा उल्लेख करु न शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पी.जी. कटरे यांनी दिलीप गावडे यांना शुभेच्छा दिल्या. गोंदियातून जातांना सर्वांकडूनच आपण काहीना काही शिकून जात असल्याचे मत निरोप समारंभाला मार्गदर्शन करताना दिलीप गावडे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्याकडून संयम, कटरे यांच्याकडून सक्षमता, विमल नागपुरे यांच्याकडून आवेश, वेगवेगळ्या शक्तींना एकत्र आणण्याचा गुण छाया दसरे यांच्याकडून, पुराम यांच्याकडून कणखरता, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून समज, कॅफोकडून परिश्रमाचे गुण घेवून जात असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले. सर्व विभागप्रमुखांच्या विविध गुणांचादेखील त्यांनी या वेळी उल्लेख केला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अशाचप्रकारे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.