शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

पर्यावरण सुरक्षेवर राष्ट्रीय सेमिनार

By admin | Updated: January 5, 2017 00:54 IST

धोेटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरण सुरक्षा विषयावर

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय : पर्यावरणाशी संबंधित समस्या मांडल्या गोंदिया : धोेटे बंधू विज्ञान महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरण सुरक्षा विषयावर युजीसीच्या मदतीने राष्ट्रीय सेमिनारचे घेण्यात आले. चर्चासत्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.ए.एम. देशमुख, डॉ.पी.आर. चौधरी, डॉ.ए.व्ही. पेठकर, पी.पी. शिक्षण महाविद्यालय गोंदियाचे प्राचार्य डॉ.बी.आर. शर्मा, सी.जे. पटेल महाविद्यालय तिरोडाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही. सिंह प्राचार्य, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू व प्रा. संजय तिमांडे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी २५० पेक्षाही अधिक सहभागी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने उद्घाटन समारंभाची सुरुवात झाली. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून प्राची रहांगडाले या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी सांगितले, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन वेळोवेळी या संस्थेच्या माध्यमाने आयोजित उपक्रमांना प्रोत्साहन देतात. सेमिनार समन्वयक प्रा. संजय तिमांडे यांनी एक दिवसीय सेमिनारचे उद्देश्य व पर्यावरण सुरक्षितेकरिता बायोटेक्नॉलॉजीचे महत्व सांगितले. अतिथी डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांनी सर्वप्रथम धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाला या चर्चासत्राच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या व सेमिनार हे पर्यावरणाशी संबधित समस्यांच्या समाधानाकरिता उत्तम मंच असल्याचे विचार व्यक्त केले. सोबतच पर्यावरणासंबंधीच्या समस्यांवरही प्रकाश टाकला. या वेळी प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते अतिथींना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रा. स्नेहा जायस्वाल यांनी आभार व्यक्त केले. प्रा. मधुमिता सिंह, प्रा. राधिका निमोनकर, ऐश्वर्या गुप्ता, श्रेया श्रीवास्तव, स्वर्णा नायडू यांनी संचालन केले. सेमिनारचे तीन सत्रात घेण्यात आले. प्रथम सत्रात मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे डॉ.ए.एम. देशमुख यांनी बायोटेक्नालॉजी इन अ‍ॅग्रीकल्चरल प्रॉडक्टीव्हिटी अ‍ॅन्ड इनव्हायरोनमेंटल सस्टेनॅबीलिटी विषयावर व्याख्यान दिले. दुसऱ्या सत्रात सहायक उपाध्यक्ष जे.एम.इन्व्हायरोनेंट प्रा. लि. गुडगाव, हरियाणा व भुतपूर्व डायरेक्टर ग्रेड शास्त्रज्ञ, निरी नागपूर येथील डॉ.पी.आर. चौधरी यांनी बॉयोटेक्नॉलॉजी इन असेसमेंट आॅफ इनव्हायरोमेंटल टॉक्सीसिटी विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात विज्ञान संस्था, औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.व्ही. पेठकर यांनी टॉक्सीसिटी अ‍ॅन्ड इनव्हायरोनमेंटल रिस्क आॅफ नॅनोपार्टीकल्स विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी नेटबॉयो फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ.एस.आर. फाले तथा तायवाडे महाविद्यालय कोराडीचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय चरडे उपस्थित होते. या सत्राचे संचालन प्रा. जायस्वाल, डॉ.गाडेकर व डॉ.एम.व्ही. कावळे यांनी केले. पर्यावरणीय सुरक्षा विषयावर शोध प्रतिनिधीद्वारे एकूण ३७ संशोधन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी एमआयइटीचे प्रा. नशिने तसेच डी.बी. सायंस महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.आर. चोपने अतिथी म्हणून उपस्थित होते. आभार संगणक विभाग प्रमुख प्रा.आर.के. धुवारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. धारणा टेंभरे, डॉ. शीतल बॅनर्जी, प्रा. प्रीती नागपुरे, डॉ. अजय घाटोले, डॉ.एस.के. पालीवाल, प्रा.डी.जी. नालमवार, प्रा.वाय.एस. बोपचे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)