शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

३४ गावांमध्ये राबविला राष्ट्रीय पोषाहार सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:53 IST

राष्ट्रीय पोषाहार सप्ताहा निमित्त अदानी फाऊंडेशतर्फे तिरोडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये पौष्टीक आहार ाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये सहज व किफायतशिर दरात उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या पोषण आहाराची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा उपक्रम : महिलांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राष्ट्रीय पोषाहार सप्ताहा निमित्त अदानी फाऊंडेशतर्फे तिरोडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये पौष्टीक आहार ाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये सहज व किफायतशिर दरात उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या पोषण आहाराची माहिती देण्यात आली.‘सुपोषण’ कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर कार्य करणाऱ्या‘संगिनी’च्या माध्यमातून गावातील महिलांना आहाराविषयी माहिती दिली. पालेभाज्या, कडधान्यापासून तयार होणाºया खाद्य पदार्थाची माहिती देऊन गावामध्ये खाद्य पदार्थ प्रदर्शनीचे व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी तसेच नागरिकांना शरीर निरोगी राहण्यासाठी व शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषण युक्त आहार महत्वाचा असल्याचा संदेश देण्यात आला. डॉ. जयश्री पेंढारकर, यांनी महिलांना सकस आहाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विविध शंकाकुशंकाचे निरासन केले. पालेभाज्या, कडधान्य, फळे यापासून पौष्टीक खाद्य पदार्थ कसे बनविले जातात याचे प्रशिक्षण दिले.या उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम तिरोडा येथील जि.प.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणावर नुकताच पार पडला.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची प्रदर्शनी भरविण्यात आली. या प्रदर्शनीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर, प्राचार्य एन.एस.रहांगडाले, प्राचार्य मंत्री, मुख्याध्यापिका जे.वाय.टेंभरे,पारधी, हरिणखेडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खाद्य प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना भेट वस्तू देण्यात आल्या. जि.प.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा, एस.डी.बी.विद्यालय खैरबोडी, गिरीजा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा, सरस्वती प्राथमिक शाळा तिरोडा, शहीद मिश्रा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा या विद्यालयाच्या प्राचार्यांचा गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सप्ताहा दरम्यान तालुक्यातील एकोडी, धामणेवाडा, गराडा, मलपुरी, बेरडीपार, मेंदीपूर, बरबसपूरा, चिखली, इंदोरा, निमगाव, सोनेगाव, चिरेखनी, कवलेवाडा, पुजारीटोला, बोदलकसा, सालेबर्डी, आलेझरी, विहिरगाव, मुंडीपार, मांडवी, जमुनिया, दांडेगाव, मेंढा, लोधीटोला, सुकडी, धादरी, ठाणेगाव, भिवापूर, खमारी या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.