शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीय बँकाची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:49 IST

खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी राष्ट्रीयीकृत बँकाना शासनाने दिले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अद्यापही यश आले नाही.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ३५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देकेवळ ३५ टक्के कर्ज वाटप : जिल्हा बँकेची उद्दिष्टपूर्ती

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी राष्ट्रीयीकृत बँकाना शासनाने दिले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अद्यापही यश आले नाही.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ३५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे.त्यामुळे पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.जिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयीकृत बॅँकामधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात.मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा नसल्याने शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकात जावे लागते.मात्र या बँकाकडून शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी तसेच एकाच कामासाठी वांरवार पायपीट करण्यास भाग पाडले जाते.त्यामुळे शेतकरी वैतागून पीक कर्जाची उचलच करीत नाही.खरीप हंगामात शेतकºयांना खते, बियाणे, किटकनाशके आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज असते.त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामादरम्यान आर्थिक अडचणीला व सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी पीक कर्जाचे वाटप केले जाते.यंदा शासनाने खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत,जिल्हा आणि ग्रामीण बँकाना २०६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र दिलेले उद्दिष्ट गाठण्यात राष्ट्रीयीकृत बँका पूर्णपणे फेल ठरल्या आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यत ३५०५ शेतकऱ्यांना ३० कोटी ६ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकांनी २५२१ शेतकऱ्यांना १६ कोटी ९९ लाख रुपयांचे वाटप केले. तर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ३१ हजार ४९ शेतकऱ्यांना ९९ कोटी ६५ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करुन शंभर टक्के उद्दिष्ट गाठले आहे.नाबार्डकडून उद्दिष्ट कमी होण्याची शक्यतामागील वर्षी शासनाने राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकाना दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यात राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांना अपयशी ठरल्या होत्या. त्यामुळे नाबार्डने यंदा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७० कोटी रुपयांनी कमी केले. त्यामुळे यंदा सुध्दा या दोन बँकाची तीच स्थिती असल्याने नाबार्डकडून पुन्हा हे उद्दिष्ट कमी होण्याची शक्यता आहे.बँकावर कारवाई करणार का?शेतकºयांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकावर फौजदारी कारवाई केली जाईल असे शासनाने सांगितले होते.यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियमित आढावा बैठकी घेण्यात आल्या.मात्र यानंतरही राष्ट्रीयकृत बँकाकडून टाळाटाळीचे धोरण सुरुच आहे.ते या बँकाना दिलेल्या उद्दिष्टावर दिसून येते.त्यामुळे याप्रकरणी शासन काय कारवाही करते याकडे लक्ष लागले आहे.चूक बँकाची खापर शेतकºयांवरराष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकाना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यात सातत्याने अपयश येत आहे. याचा दिलेला उद्दिष्टावर परिणाम होत आहे.त्यामुळेच नाबार्डने पीक कर्जाचे उद्दिष्ट कमी केले.त्यानंतर यंदा सुध्दा तीच स्थिती आहे.त्यामुळे बँकेच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांवर फुटणार असून त्यांना पुन्हा सावकार आणि नातेवाईकांपुढे हात पसरावे लागणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक