शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नाव सन्मान योजना प्रत्यक्षात अवमानच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:12 IST

मायबाप सरकार, आम्ही मागीतले नाही. निवडणूक तोंडावर आल्या असतांना आपण आम्हाला लॉलीपॉप देत आहात. शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे हा राज्यकर्ताचा गुणधर्मच आहे. आम्ही मागणी घालत नाही. तुम्हीही देऊ नका पण शेतकऱ्यांची ही थट्टा आतातरी थांबवा हो अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांची थट्टा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मायबाप सरकार, आम्ही मागीतले नाही. निवडणूक तोंडावर आल्या असतांना आपण आम्हाला लॉलीपॉप देत आहात. शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे हा राज्यकर्ताचा गुणधर्मच आहे. आम्ही मागणी घालत नाही. तुम्हीही देऊ नका पण शेतकऱ्यांची ही थट्टा आतातरी थांबवा हो अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणली. एका डौलदार कार्यक्रमात देशातील शेतकºयांना तीन हिस्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर २४ फेब्रुवारीला आला. संदेश वाचून हायसे वाटले. हा संदेश फेकू असेल असे कुणाला ठाऊक? बँकेत गेल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसेच नाही. बँक व्यवस्थापनाला विचारणा केली तर ते तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला देतात. शेतकरी बँकेत येतात व निराश होऊन आल्यापावलीच नाहक आर्थिक व शारीरिक खर्च करुन परत जातात. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बँकेतून पैसे जमा झाल्याचा संदेश येतो. मात्र ते पैसे परत गेल्याचा संदेश येत नाही व बँक खात्यातही पैसे जमा होत नाही. असा हा प्रकार इटखेडा येथील प्रमोद महादेव गोंडाणे या शेतकऱ्यांशी घडला आहे. त्यांच्या स्टेट बँक शाखेच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश आला. मात्र चौकशी केली तेव्हा खात्यात पैसेच जमा झाले नसल्याचे कळले. योजनेचे नाव शेतकरी सन्मान असले तरी मात्र अपमानच पदरी पडल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना