शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत आचारसंहिता नावालाच; काम कमी, कर्मचाऱ्यांच्या कानाला मोबाइल जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : अलीकडे सुलभ आणि वेगवान संपर्काचे माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे; परंतु मोबाइलवर बोलताना ...

गोंदिया : अलीकडे सुलभ आणि वेगवान संपर्काचे माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे; परंतु मोबाइलवर बोलताना अपेक्षित शिष्टाचार पाळला जात नाही. अशा प्रकारच्या वर्तवणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते. यासाठी शासकीय कार्यालयात मोबाइलवर जास्त बोलणे, जोराने बाोलणे, जास्त वेळ बोलणे याला बंदी घातली आहे. मोबाइलवर बोलताना काय काळजी घ्यायची, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कार्यालयात मोबाइलवर सतत बोलत असल्याचे चित्र आहे.

............................

१) काय आहे आचारसंहिता?

कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाइलचा वापर करावा. मोबाइलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाइलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाइलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.

......................................

काम नावाला, मोबाइल कायम कानाला

१) जिल्हा परिषद

गोंदियाच्या जिल्हा परिषदेत कर्मचारी मोठ्या प्रमाणात मोबाइलवर बोलत असतात. काम कमी आणि मोबाइलवर बोलणेच जास्त असते. शासकीय कामदेखील मोबाइलवरूनच केले जाते. त्यामुळे त्याचा आधार घेत अनेक कर्मचारी मोबाइलवरच लागले राहतात.

.....

२) वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया

येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी तासन्‌तास मोबाइलवर बोलत असतात. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कामात व्यस्त आहे, असे जरी सांगत असले तरी आरोग्य विभागातील आस्थापनेतील कर्मचारी तासन्‌तास मोबाइलवर वेळ घालवित असतात.

................................

कार्यालय प्रमुख म्हणतात

कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेवढाच मोबाइलवर बोलता येईल. स्वत:च्या खासगी कामाने मोबाइलवर बोलू नये. मोबाइलवर बोलताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कार्यालयातील वरिष्ठांच्या कॉलला तत्परतेने उत्तर द्यावे.

- नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प. गोंदिया.

......................

भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व

भाषेचे भान असावे. अत्यावश्यक वैयक्तिक बोलायचे असेल तर कार्यालयाबाहेर जाऊन बोलावे, बैठकीत मोबाइलचा वापर करू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत.- डॉ. नरेश तिरपुडे, वैद्यकीय अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

....................

सरकारी कार्यालय नको रे बाबा!

सरकारी कामकाजासाठी कार्यालयात गेल्यावर कर्मचारी आपल्या मोबाइलवरच मश्गूल असतात. माहिती घेण्यासाठी तासन्‌तास त्यांच्या पुढे बसूनही ते मोबाइलवरच असतात. त्यांच्या मोबाइल ठेवण्याच्या प्रतीक्षेत आम्हाला कंटाळा येतो.

-संघर्ष हुकरे, करंजी.

............

शासकीय कामकाजासाठी कार्यालयात गेल्यावर आम्हाला कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. संगणकावर गेम खेळत बसतात किंवा फोनवर तासन्‌तास माेबाइलवर बोलतात. माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर रागवून टाळाटाळीची उत्तरे देतात.

- सौरभ गडपायले, इर्री.