शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.

ठळक मुद्देवन्यप्रेमींसाठी आली ह्यगूड न्यूजह्ण : शासनाच्या अटी-शर्तींचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेले तालुक्यातील नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार वर्षापुर्वी या जंगलात हत्तीचे वास्तव्य होते. पाण्याचे झरेसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने या अभयारण्याला नागझिरा असे नाव पडले. या अभयारण्यात अनेक पशुपक्षी व झाडे बघायला मिळतात. हे अभयारण्य गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या मधोमध असून १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यामध्ये वीज पुरवठा अजिबात नाही.हे जंगल नैसर्गिकच राखलेले आहे. यात २०० पक्ष्यांची नोंद असून वाघ, बिबट्या, रानडुकर, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, चौसिंगा, नीलगाय, चितळ, सांभर असे असंख्य पशु आहेत. सर्पगरुड, मत्स्यगरुड, टकाचोर, नवरंग, कोतवाल, खाटीक, राखीधनेरा आदि अनेक पक्षी अभयारण्यात उडताना दिसतात.अभयारण्यात प्रवेश करताच सांबर, चितळ, हरिण, निलगाय, रानगवा, अस्वल आदि प्राणी रस्त्याच्या दुतर्फा मुक्तपणे संचार करताना दिसतात. आजूबाजूला माकडे फांद्यावर उडया मारत असताना पर्यटकांचे मन मोहून टाकतात.पावलापावलावर दिसणारी हरणे, माकडे त्याचप्रमाणे राज्यपक्षी हरियाल, हळद्या, निलपंखी, स्वर्गीयनर्तक, नवरंगी, तुरेवाला, सर्प गरुड, व्हाईट आईड बझार्ट यासारखे शिकारी पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे निरनिराळ्या प्रकारची कोळी, पट्टेवाला वाघ, अस्वले, रानकुत्रे अभयारण्यात आहेत.पर्यटकांनी असे जावेया अभयारण्याच्या आसपास आवर्जुन भेट द्यावी, असे नवीन नागझिरा, नवेगावबांध जलाशय, चोरखमारा जलाशय, अंधारबन, नागदेव पहाडी, कोसमतोंडी त्याचप्रमाणे काही अंतरावर कान्हा प्रकल्प, पेंच प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा दुवा आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून २२ किलोमीटर पिटेझरी गेटवरुन या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून १२ किलोमीटर अंतरावरुन या अभयारण्यात प्रवेश करता येते.या आहेत आटी-शर्तीकोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पयर्यटनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही, सर्व पर्यटक, गाईड व वाहन चालक यांना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, तसेच वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करणे आवश्यक राहील, वनक्षेत्रात मास्क, हातमोजे, पाणी बाटल व फेकणे जाणार याची दक्षता घ्यावी लागेल, प्रवेशद्वारावर शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल यासह अन्य आटींचे पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :Nagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प