शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा फुटाळा तलाव अवतरणार गोंदियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:31 IST

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर येथील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येत्या पावसाळ्याच्या पूर्वी सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कळले. फुटाळा तलावा प्रमाणेच बोडीचे सौंदर्यीकरण होणार असल्याने फुटाळा तलावच गोंदियात अवतरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देबोडीचे सौंदर्यीकरण : पाथवे, लाईटिंग व रेलिंगसारखी कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर येथील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येत्या पावसाळ्याच्या पूर्वी सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कळले. फुटाळा तलावा प्रमाणेच बोडीचे सौंदर्यीकरण होणार असल्याने फुटाळा तलावच गोंदियात अवतरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीचे सौंदर्यीकरण व्हावे ही प्रत्येकच सिव्हील लाईन्सवासीची इच्छा होती. मागील कित्येक वर्षांपासूनची त्यांची ही इच्छा आता पूर्णत्वास येत आहे. कारण, बोडीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला जोमात सुरूवात झाली आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी सौंदर्यीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावयाचे असल्याची माहिती नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्रीकांत डोंगरे यांनी दिली.हे काम कंत्राटदार श्याम चंदनकर यांना देण्यात आले असून यात सुमारे जीड कोटींचा खर्च केला जाणार आहे. सध्या सौंदर्यीकरणातंर्गत पाथवेचे काम सुरू आहे. बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम फुटाळा तलावाप्रमाणे केले जात असल्याची माहिती आहे. असे झाल्यास येथे सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्यांची गर्दी होणार. परिणामी शहरातील सुभाष बागेत वाढणारी गर्दी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, येथे दुकानी लागणार व लोकांची गर्दी वाढणार असल्यामुळे येथील दृष्ट बघण्याजोगे राहणार.सौंदर्यीकरणात ही कामे होणारबोडीच्या सौंदर्यीकरणांतर्गत चारही बाजूंनी सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले आहे. या भिंतीला लागून वृक्षारोपण केले जाणार आहे. चारही बाजूंनी पाथवे तयार केले जात असून त्याला सुरक्षेच्या दृष्टीने रेलींग लावली जाणार आहे. पाथवेवर आकर्षक लाईटींगची व्यवस्था केली जाणार आहे. या शिवाय एक टँक तयार केले जात असून पाण्याने भरून राहणाºया या टँकमध्ये उतरणे व चढण्यासाठी चारही बाजूंनी पायºया तयार केल्या जाईल.दुसऱ्या टप्प्यात कारंजे लागणारया टँकमध्ये कारंजे लावले जाणार असून हे काम दुसºया टप्प्यात केले जाणार आहे. सध्या या कामासाठी ड्रॉर्इंग तयार केली जात आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होताच व पावसाळा संपल्यानंतर कारंजे लावण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता जुनघरे यांनी दिली.